गेल्या काही दिवसांपासून ‘खतरों के खिलाडी ११’ या शोची खूप चर्चा रंगली आहे. अलीकडेच शोमधील स्पर्धकांची यादी समोर आली होती. आता शोची शूटिंग सुरू करण्यात येणार आहे. यासाठी सेलेब्स रवानाही झाले आहेत. शोच्या या सिझनमध्ये राहुल वैद्यही स्पर्धक म्हणून दिसणार आहे. अशा परिस्थितीत राहुलने एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो इंटरनेटवर खूप पसंत केला जात आहे.
गर्लफ्रेंड दिशा परमार राहुलच्या जाण्याने नाराज आहे. राहुलने आता त्यांचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये दिशा त्याला एका पट्ट्याने पकडून लिफ्टच्या दिशेने नेताना दिसली आहे. व्हिडिओमध्ये राहुलने ‘छोटा बच्चा जानके हमको’ हे गाणे लावले आहे. हा व्हिडिओ शेअर करत राहुलने कॅप्शनमध्ये लिहिले की, “ती म्हणतेय की, मला सोडून खतरों के खिलाडीच्या सापांकडे जाऊ नको.”
दोघांच्या या व्हिडिओवर चाहते भरभरून प्रेम व्यक्त करत आहेत. तसेही, राहुल आणि दिशा हे सध्या टीव्हीचे आवडते जोडपे आहेत. शोसाठी जाण्यापूर्वी राहुलने दिशाबरोबर बराच वेळ घालवला, कारण दोघांना पुन्हा काही दिवसांसाठी वेगळे राहावे लागेल.
भलंमोठं मानधन घेतोय राहुल
माध्यमांतील वृत्तांनुसार, राहुलला एका एपिसोडसाठी तब्बल १२-१५ लाख रुपये दिले जातील. आता राहुल जोपर्यंत या शोचा भाग असेल, तोपर्यंत तो चांगली कमाई करेल.
नाकारली डान्स रियॅलिटी शोची ऑफर
राहुल आणि दिशा परमारला डान्स रियॅलिटी शो ‘नच बलिये’ची ऑफर मिळाल्याचेही वृत्त आहे. मात्र, गायकाने ही ऑफर नाकारली आहे, कारण आता दोघे लग्न करणार आहेत. तथापि, लग्नाच्या तारखेविषयी अद्याप काहीही सांगण्यात आले नाही. तोपर्यंत राहुल ‘खतरों के खिलाडी’ मध्येच दिसेल. राहुलशिवाय या वेळी वरुण सूद, सनाया इराणी, अर्जुन बिजलानी, दिव्यांका त्रिपाठी, अभिनव शुक्ला यांच्यासह आणखी अनेक सेलेब्स या सिझनमध्ये दिसणार आहेत.
कधी सुरू होईल खतरों के खिलाडी
नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, या शोचे शूटिंग यावेळी केपटाऊनमध्ये होणार आहे. ६ मे रोजी सर्वजण उड्डाण घेतील आणि तेथे १ महिना थांबतील. याअगोदर एप्रिलमध्ये या शोचे शूटिंग होणार होते, पण कोव्हिडमुळे शूटिंगला उशीर झाला. यानंतर, निर्मात्यांनी केपटाऊनमध्ये शूटिंग करण्याचा निर्णय घेतला.
रोहित शेट्टीच करणार होस्ट
हा सिझन देखील रोहित शेट्टीच होस्ट करणार आहे. गेल्या काही सिझनपासून रोहित हा शो सतत होस्ट करत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, हा शो जूनच्या किंवा जुलैच्या शेवटी सुरू होऊ शकेल.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीने शेअर केले नवीन फोटो, पाहून तुम्हीही म्हणाल, ‘अगं पडशील ना!’