कमालच म्हणायची! वयाच्या ४४ व्या वर्षीही अभिनेत्री दिसते खूपच आकर्षक, सोशल मीडियावरील फोटोंनी लावली आग


बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस इंडिया इंटरनेशनल, पूजा बत्रा सगळ्यांच्याच आवडती आहे. अभिनेत्रीने तिच्या चित्रपट कारकीर्दीत, अनेक प्रसिद्ध भूमिका साकारल्या आहेत. ९०च्या दशकापासून तिचे, आकर्षक अंदाजासाठी चाहत्यांनी खूप कौतुक केले आहे. अभिनेत्री ४४ वर्षांची आहे, परंतु अजूनही ती खूप सुंदर आणि आकर्षक दिसते.

सन १९९७ मधील अनिल कपूर आणि अमरीश पुरी अभिनित ‘विरासत’ या चित्रपटात पूजाही  होती. चित्रपटामध्ये पूजाचा आकर्षक अंदाज अजूनही अबाधित आहे. ती पूर्वीपेक्षाही अधिक आकर्षक झाली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

पूजा आता चित्रपटांपासून दूर राहते, पण सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, आणि तिचे बरेच आकर्षक फोटो व्हायरल झाले आहेत.

पूजा बत्रा योगा करण्यात माहिर आहेत. तिच्या इंस्टाग्रामवर भरपूर फोटो आहेत, ज्यावरून असे दिसून येते की, ती योगामध्ये तज्ज्ञ आहे.

पूजाने योगा करून खूप तंदुरुस्त शरीर मिळवले आहे, तिला बघून नवीन अभिनेत्रीही तिच्यासारखे राहायचा विचार करतील, परंतु या वयात देखील इतके तंदुरुस्त दिसणे चमत्कारासारखे आहे. पूजा बत्राचे बिकिनी फोटो इंस्टाग्रामवर उपलब्ध आहेत, ज्यामुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडते.

ती नेहमीच तिच्या आकर्षक फोटोशूट्सचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करते. ज्यात तिला ७ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

पूजा बत्राने बॉलिवूडमध्येच नव्हे, तर साऊथ सिनेमातही बरेच काम केली आहेत. तिचे मल्याळम, तमिळ आणि तेलुगु भाषेत चित्रपट प्रसिद्ध झाले आहेत.

पूजाचे साऊथच्या चित्रपटांमध्ये पदार्पण, मणी रत्नम यांच्या १९९५ मध्ये प्रदर्शित  झालेल्या ‘आसई’ या तमिळ चित्रपटातून झाले होते. यानंतर, ती नागार्जुन यांच्या १९९५ सालच्या तेलुगु चित्रपट ‘सिसिंद्री’ मध्ये दिसली होती.

पूजाने २००२ मध्ये लॉस एंजेलिस डॉक्टर सोनू आहलुवालिया यांच्याशी लग्न केले. पण २०११ साली तिने पतीशी घटस्फोट घेतला. यानंतर पूजाने वर्ष २०१९ मध्ये प्रसिद्ध अभिनेता नवाब शाहशी लग्न केले. पूजा इंस्टाग्रामवर, नवाबबरोबर बरेच फोटो पोस्ट करते, आणि लोकांना ही जोडी खूप आवडते.

नवाब शाह बर्‍याचदा चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका करताना दिसतो. त्याचे रोल लहान आहेत, पण खूप प्रभावी आहेत. नवाबने ‘डॉन २’, ‘दबंग’, ‘टायगर जिंदा है’ अशा बर्‍याच चित्रपटांत काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लग्नानंतरही सुगंधा आणि संकेत करतायत चाहत्यांचे मनोरंजन, पाहा त्यांची ही कॉमेडी, हसून हसून तुम्हीही व्हाल लोटपोट

-‘कधीही न विसरता येणारा!’ अल्लू अर्जुनच्या चिमुकलीने त्याच्यासाठी बनवला ‘खास डोसा’, कोरोना पॉझिटिव्हनंतर घरातच आहे क्वारंटाईन

-ऑक्सिजन लेव्हल वाढवण्याची पद्धत शिकवणाऱ्या कलाकारांवर अभिनेत्रीने साधला निशाना, म्हणाली…


Leave A Reply

Your email address will not be published.