‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीने शेअर केले नवीन फोटो, पाहून तुम्हीही म्हणाल, ‘अगं पडशील ना!’

Dancer Nora Fatehi Gave Beautiful Falling Poses In Tight Blue Bodycon Dress Which Made Fans Go Crazy


बॉलिवूडमध्ये अनेक जण येतात आणि जातात, पण खूप कमी जणांना येथे आपले पाय रोवून एका डोंगरासारखे उभे राहता येते. यामध्ये डान्सर, अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक आणि इतर बरंच काही बनण्याचे त्यांचे ध्येय असते. काही यात यशस्वी होतात आणि आपली वेगळी ओळख निर्माण करतात. त्यातीलच एक अभिनेत्री आणि डान्सर म्हणजे ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेही होय. नोराने कमी काळात आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. आता तिला कोणत्याही परिचयाची गरज नाही. जगभरात तिचे चाहते आपल्याला पाहायला मिळतात. तिचे सोशल मीडियावरील चाहतावर्ग तर प्रचंड मोठा आहे. तिला इंस्टाग्रामवर तब्बल २७. ३ मिलियन म्हणजेच २ कोटी ७३ लाखांपेक्षा अधिक इतके फॉलोवर्स आहेत. ती नेहमीच आपले व्हिडिओ आणि फोटो शेअर करून चाहत्यांशी संवाद साधत असते. नुकतेच तिने आपले फोटो शेअर केले आहेत. पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला आहे.

तिने शेअर केलेले फोटो पाहून असे दिसते की, ती स्वत: ला सांभाळू शकत नाहीये. परंतु असे नाही, तर ती तिची हटके स्टाईल आहे. त्यामध्ये ती सर्वांना हैराण करताना दिसत आहे. यामध्ये तिने निळ्या रंगाचा पूर्ण ड्रेस घातला आहे.

नोरा फतेहीने नुकतेच आपल्या ग्लॅमरस लूकचा तडाका ‘डान्स दीवाने ३’ च्या मंचावरही दाखवला. ती वेगळ्याच अंदाजात या मंचावर पोहोचली होती. नोरा फतेहीने नुकतेच आपल्या ग्लॅमरस लूकचा तडाका ‘डान्स दीवाने ३’ च्या मंचावरही दाखवला. ती वेगळ्याच अंदाजात या मंचावर पोहोचली होती.

‘डान्स दीवाने ३’ च्या सेटवरील फोटो तिचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.

तिचे फोटो पाहिल्यावर समजते की, ती किती फिट आणि लवचीक आहे.

नोराच्या या फोटोंना लाखो लाईक्स आणि हजारो कमेंट्स मिळाल्या आहेत.

नोराच्या कारकिर्दीविषयी बोलायचं झालं, तर तिने सन २०१४ साली ‘रोर: टायगर ऑफ द सुंदरबन्स’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. तिने आतापर्यंत अनेक आयटम साँग्स दिले आहेत. त्यामध्ये ‘दिलबर दिलबर’, ‘ओ साकी’, ‘पछताओगे’, ‘एक तो कम जिंदगाणी’, ‘छोड देंगे’ यांसारख्या गाण्यांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कधीही न विसरता येणारा!’ अल्लू अर्जुनच्या चिमुकलीने त्याच्यासाठी बनवला ‘खास डोसा’, कोरोना पॉझिटिव्हनंतर घरातच आहे क्वारंटाईन

-ऑक्सिजन लेव्हल वाढवण्याची पद्धत शिकवणाऱ्या कलाकारांवर अभिनेत्रीने साधला निशाना, म्हणाली…

-आयपीएलमध्ये खुलेआम केले होते किस, का झाले होते दीपिका पदुकोण आणि सिद्धार्थ मल्ल्याचे ब्रेकअप? अभिनेत्रीने केले स्पष्ट


Leave A Reply

Your email address will not be published.