Saturday, October 19, 2024
Home बॉलीवूड या चित्रपटांचे व्हिडीओज झालेत शूटिंग दरम्यान लिक; पहा ही मजेदार यादी…

या चित्रपटांचे व्हिडीओज झालेत शूटिंग दरम्यान लिक; पहा ही मजेदार यादी…

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनच्या आगामी ‘वॉर 2’ चित्रपटाच्या शूटिंगचे व्हिडिओ सतत लीक होत आहेत. चित्रपटाच्या शूटिंगचे व्हिडिओही सातत्याने व्हायरल होत आहेत. तथापि, हा पहिला चित्रपट नाही ज्याचे व्हिडिओ लीक होत आहेत. याआधीही अनेक मोठ्या चित्रपटांच्या शूटिंगचे व्हिडिओ लीक झाले आहेत. आम्ही तुम्हाला त्या खास चित्रपटांबद्दल सांगतो ज्यांचे शूटिंग व्हिडिओ लीक झाले आहेत.

कुली 

रजनीकांत श्रुती हसन नागार्जुन अक्किनेनी यांचा आगामी चित्रपट कुली सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचे अनेक सिन्स सोशल मिडीयावर लिक झाले आहेत. शूटिंग दरम्यान कुणीतरी ते रेकॉर्ड केले होते ज्यानंतर ते वेगाने व्हायरल होत आहेत. यामध्ये नागार्जुन जबरदस्त एक्शन करताना दिसतो आहे. 

डंकी 

शाहरुख खान आणि राजकुमार हिरानी यांच्या डंकी  या चित्रपटाचे काही व्हिडीओज व्हायरल झाले होते. या व्हिडीओ मध्ये शाहरुख खान आणि तापसी पन्नू एकत्र शूटिंग करताना दिसत होते. हा चित्रपट मागील वर्षी २२ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित झाला होता. 

सन ऑफ सरदार २ 

अजय देवगण आणि संजय दत्त स्टारर सन ऑफ सरदार २ ची शूटिंग स्कॉटलंड येथे सुरु झाली आहे. चित्रपटची नायिका मृणाल ठाकूर हिचे काही फोटोज सेट वरून व्हायरल झाले आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कुमार अरोरा करत आहेत. 

ठग लाईफ 

मणीरत्नम दिग्दर्शित ठग लाईफ या चित्रपटाची शूटिंग सध्या सुरु आहे. चेन्नई मध्ये शूटिंग दरम्यान एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये सिलम्बरासन शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसत होते. 

वॉर 2

वॉर 2 चे दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहे.  या चित्रपटाची शूटिंग सध्या इटली मध्ये सुरु आहे. या चित्रपटाच्या शूटिंग चे व्हिडीओज सध्या व्हायरल होत आहेत. 

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

रणवीर सिंग करतोय डॉन ३ ची तयारी ? जिम मधील फोटोने वेधले सर्वांचे लक्ष

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा