Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

जॅकी श्रॉफ यांना ‘या’ नावाने बोलावते दिशा पटानी; मुलाखतीत स्वतः अभिनेत्यांनी केला खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या अभिनय आणि हॉट अदांनी चाहत्यांना पुरते वेडे करते. दिशा गेल्या बर्‍याच काळापासून अभिनेता टायगर श्रॉफला डेट करत आहे. टायगर आणि दिशा खुल्लम खुल्ला एकमेकांसोबत फिरताना दिसतात. दिशा आता टायगरचे वडील जॅकी श्रॉफ यांच्यासोबत सलमान खान अभिनित ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटात दिसणार आहे.

या चित्रपटात, जॅकी श्रॉफ हे दिशा पटानीच्या भावाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. सर्वांना माहित आहे की, दिशा टायगरला डेट करत आहे. अशा परिस्थितीत, प्रत्येकाची नजर दिशा व जॅकींच्या भाऊ- बहिणीच्या भूमिकेवर असणार आहे. त्यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक बरेच उत्सुक आहेत.

दिशा जॅकींना काय म्हणून बोलावते?
माध्यमांतील वृत्तांनुसार, जेव्हा जॅकी श्रॉफ यांना विचारले गेले होते की, दिशाने त्यांना सेटवर कसे संबोधित केले. सर, जॅकी अंकल किंवा इतर काही? यावर ते म्हणाले की, “हे ठीक आहे की बहुतेक वेळा कोणत्याही नावाने संबोधित नाही केले. जसे की दोन लोक एकत्र असतात, तेव्हा ते एकमेकांचे नाव घेत नाहीत.”

जॅकी पुढे म्हणाले की, “सांगण्यासारखे एवढे काही नाही. परंतु मला जेवढे आठवते, मला असे वाटते की तिने मला काहीवेळा ‘सर’ म्हणून संबोधले होते. कारण अंकल खूप वेगळा शब्द वाटतो. मी तुमच्या वडिलांचा भाऊ कसा होऊ शकतो. कारण दोघांचीही कुटुंबं भिन्न आहेत.”

अद्याप उघडपणे नाही स्वीकारले नाते
टायगर आणि दिशा दोघांनीही आपापल्या नात्यास दुजोरा दिलेला नाही. मात्र, २०१९ मध्ये जॅकी म्हणाले होते की, “हे जोडपे भविष्यात लग्न करू शकतात किंवा आयुष्यभर मित्र बनून राहू शकतात.”  त्यांनी सांगितले होते की, टायगरला त्याचा पहिला मित्र मिळाला, जी एक २५ वर्षांची मुलगी आहे. तोपर्यंत त्याने इकडे-तिकडे कधीच पाहिले नव्हते.

दिशा आणि टायगर नुकतेच मालदीवला एकत्र फिरायला गेले होते. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर टायगर लवकरच ‘गणपत’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात क्रिती सेनन पुन्हा एकदा त्याच्यासोबत काम करणार आहे. याशिवाय दिशा जॉन अब्राहम, अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया यांच्यासोबत ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या आगामी चित्रपटामध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तू एक हिरो आहेस’, अभिनेत्री सारा अली खानने केलेल्या ‘या’ कामामुळे सोनू सूदेकडून प्रशंसा

-ढोल ट्विस्टसोबत व्हायरल झाले रवीना टंडनचे ‘टिप टिप बरसा पाणी’ गाणे, अभिनेत्रीनेही व्हिडिओ केला शेअर

-श्वास रोखून धरा! तब्बल १०० कोटी रुपये घेत साऊथ सुपरस्टार ‘विजय देवरकोंडा’ करणार बॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री

हे देखील वाचा