Friday, April 19, 2024

‘तू एक हिरो आहेस’, अभिनेत्री सारा अली खानने केलेल्या ‘या’ कामामुळे सोनू सूदेकडून प्रशंसा

कोरोना महामारीतून आपल्या देशाची सुटका करण्यासाठी सगळेच प्रयत्न करत आहेत. रुग्णांना शक्य होईल ती मदत करत आहेत. अनेक कलाकार देखील या महामारीत त्यांचे योगदान देत आहेत. सामान्य नागरिकांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. यामध्ये समावेश होतो तो म्हणजे सैफ अली खानची मुलगी सारा अली खान हिचा. साराने देखील खारीचा वाटा उचलला आहे. या गोष्टीची माहिती सोनू सूदने सोशल मीडियावर दिली आहे. सोनू सूदने एका ट्विटद्वारे सांगितले की, सारा अली खानने कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी त्याने स्थापन केलेल्या सूद फाउंडेशनमध्ये दान केले आहे.

सोनू सूदने सारा अली खानचे आभार मानत एक ट्वीट केले आहे. ज्यामध्ये त्याने साराने केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक केले आहे. त्याने ट्वीट करून लिहिले आहे की, “सूद फाउंडेशनमध्ये मोलाचे योगदान दिल्याबद्दल मी सारा अली खानचे खूप कौतुक करत आहे. मला तुझा खूप अभिमान वाटत आहे. चांगल्या कामांना तू अशाच प्रकारे प्रोत्साहन देत असते. हे काम करून तू केवळ तुझे योगदान नाही दिले, तर तरुणांना देखील या प्रसंगात पुढे येऊन हातभार लावण्यासाठी प्रेरित केले आहे. तू एक हिरो आहेस सारा अली खान.”

सोनू सूदने केलेल्या या ट्विटवर अनेक युजर्स प्रतिक्रिया देत आहेत आणि तिचे कौतुक करत आहेत. सारा अली खान देखील सोशल मीडियावरून प्रेक्षकांना घरीच राहण्याचे आणि सगळे नियम पाळण्याचा संदेश देत होती. ती नागरिकांना घरी राहा असे सांगत होती. पण तिच्या या वक्तव्यामुळे ती ट्रोल झाली होती.

सारा अली खानचे हे बोलणे अनेक युजरला आवडले नव्हते. कारण काही दिवसांपूर्वी सारा काश्मीर ट्रीपला गेली होती. त्यादरम्यानचे अनेक फोटो तिने शेअर केले होते. त्यावेळी युजरने तिच्या फोटोवर कमेंट करून तिला घरात राहण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या मते ही स्वतः ट्रीपला जाते आणि इतरांना घरी राहण्याचा सल्ला देत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बोल्डनेसचा तडका! अमेरिकन मॉडेल किम कर्दाशियानचे बोल्ड फोटो व्हायरल, वाढला सोशल मीडियाचा पारा

-‘दे दान दन’ फेम अभिनेत्री समीरा रेड्डीने मिळवला कोव्हिडवर विजय! मुलांसोबत मस्ती करत अभिनेत्रीने दिला तंदुरुस्तीचा मंत्र

-सुपरस्टार दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या हवेली ताब्यात घेण्याचा पाकिस्तान सरकारचा निर्णय; मालकांना बजावली नोटीस

हे देखील वाचा