दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत (sushant singh rajput)‘पवित्र रिश्ता’ या प्रसिद्ध मालिकेतून घराघरात पोहोचला होता. त्याने चित्रपटांमध्येही आपली छाप सोडली आहे. अगदी कमी वेळातच त्याने त्याचा एक चाहता वर्ग तयार केला होता. सुशांतने १४ जून, २०२० रोजी या जगाला निरोप दिला होता. अभिनेत्याच्या निधनानंतर, त्याचा ‘दिल बेचारा’ हा शेवटचा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म डिझनी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बघितल्यानंतर नक्कीच प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल.
प्रेक्षकांनी चित्रपटाला आणि सुशांतला मनापासून पसंती दिली होती. ‘दिल बेचारा’ च्या काही सीन्समध्ये सुशांतचा आवाज नाहीये, हे तुम्हाला माहिती आहे का? एका आरजेने अभिनेत्याच्या निधनानंतर, चित्रपटात सुशांतचा आवाज डब केला होता. ‘दिल बेचारा’मध्ये एका आरजेने सुशांतला आपला आवाज दिला होता. आरजे आदित्यने माध्यमांशी बोलताना हे कसे घडले, याबद्दल संपूर्णपणे स्पष्ट केले आहे.
खरं तर, सुशांतच्या चित्रपटात काही डबिंग बाकी होते, पण त्याआधीच सुशांतचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अखेरच्या क्षणी, आरजे आदित्यची मदत घ्यावी लागली होती. याबद्दल बोलताना आरजे म्हणाला, ‘मला वाटते की, हे सर्व सुशांतच्या अचानक निघून गेल्यानंतर सुरू झाले होते. असे काहीतरी घडेल, असे कोणालाही वाटले नव्हते. सुशांतचे निधन झाल्यानंतर अजून चित्रपटाचे डबिंग बाकी होते, जे सुशांत स्वत: आता कधीच करू शकत नव्हता. दिल बेचारा यांची टीम व्हॉईस आर्टिस्ट शोधत होती. यासाठी त्यांनी बर्याच व्हॉईस आर्टिस्टच्या आवाजाचे ऑडिशन घेतले होते, पण त्यांना पटले नाही, मग त्यांना माझा शोध लागला होता.’
‘एके दिवशी मुकेश छाबरा यांच्या ऑफिसमधून, एक व्यक्ती माझ्याकडे आली होती. त्यांनी सांगितले की, मी सुशांतच्या आवाजाची मिमिक्री करावी. त्यांनी मला सुशांत सिंग राजपूतच्या ‘एमएस धोनी’ चित्रपटाची एक क्लिप पाठविली होती, ज्यात मी अभिनेत्याचा आवाज डब करण्याचा प्रयत्न करत होतो. सुशांतचा आवाज कॉपी करण्यासाठी मला थोडा वेळ लागला. कारण मी त्याचा आवाज कॉपी करण्याचा कधीही प्रयत्न केला नव्हता. मी पहिल्यांदाच सुशांतचा आवाज कॉपी करत होतो. पण जेव्हा मी ऑडिशन टेप त्यांना पाठवली, तेव्हा मला मुकेश छाबरा यांच्या कार्यालयातून फोन आला. त्यांनी मला सांगितले की, मुकेश छाबरा तुमच्याशी बोलू इच्छितात.’
आरजेने पुढे सांगितले की, ‘सुशांतचा आवाज कॉपी करण्यासाठी, दोन दिवस अजून घेतले होते. याचे कारण म्हणजे, पात्रातल्या भावनादेखील दाखवता येतील.’
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही नक्की वाचा-