सुशांत सिंग राजपूत हा हिंदी सिनेसृष्टीतील एक आघाडीचा हरहुन्नरी कलाकार म्हणून प्रसिद्ध होता. आपल्या कसदार अभिनयाने त्याने चित्रपटक्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र, यशाच्या शिखरावर असतानाच त्याच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण चित्रपट क्षेत्राला मोठा धक्का बसला होता. सर्वांच्या मनावर राज्य करणारा सुशांतची बुधवारी ( दिनांक १४ जून ) पुण्यतिथी आहे. त्या निमित्त जाणून घेऊया त्याच्या कारकिर्दीबद्दल…
चार बहिणींच्या पाठीवर एकुलता एक भाऊ
सुशांत सिंग राजपूतचा (Sushant Singh Rajput) जन्म २१ जानेवारी, १९८६ रोजी बिहारच्या पटना येथे झाला होता. त्याने १२ वीत असतानाच आपल्या आईला गमावले होते. त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंवरून सिद्ध होते की, सुशांतला त्याच्या आईवर किती प्रेम होते. सुशांतचा जन्म होण्यासाठी त्याच्या आईला अनेक नवस करावे लागले होते. त्याच्या कुटुंबाने सुशांतच्या जन्मासाठी अनेक मंदिरात प्रार्थना केली होती. कारण सुशांत हा त्याच्या चार बहिणींच्या पाठीवर झालेला एकुलता एक भाऊ होता.
त्याच्या जन्मासाठी आई उषासिंगने अनेक मंदिरात डोके टेकवले होते. म्हणूनच लहानपणी त्याची आई त्याला गुलशन या नावाने हाक मारत होती. त्याच्या आईचे त्याच्यावर खूप प्रेम होते. मात्र, मायलेकाचे हे प्रेम नियतीला कदाचित मान्य नव्हते. म्हणूनच सुशांत अवघ्या १६ वर्षाचा असताना त्याच्या आईचा अकाली मृत्यू झाला.
आईच्या मृत्यृने सुशांतला जोरदार धक्का बसला होता. मात्र, या धक्क्यातून सावरत त्याने आपल्या मोठ्या बहिणीला आई मानायला सुरुवात केली. तिच्याबरोबर अनेकदा त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. मात्र, तो आपल्या आईला कधीही विसरू शकला नाही. त्याच्या मृत्यूच्या १० दिवस अगोदर त्याने आपल्या आईसाठी एक भावुक पोस्ट लिहिली होती. या पोस्टने त्याच्या चाहत्यांनाही गोंधळात टाकले होते.
सुशांतच्या चित्रपट क्षेत्रातील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्याला या क्षेत्रात आपली ओळख बनवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता. २००८ मध्ये आलेल्या ‘किस देश में है मेरा दिल’ या मालिकेतून त्याने आपल्या अभिनय क्षेत्राला सुरूवात केली असली तरी त्याला या कार्यक्रमाने जास्त यश मिळवून दिले नाही. मात्र, यानंतर आलेल्या ‘पवित्र रिश्ता’ मालिकेने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेतील त्याच्या भूमिकेच सर्वत्र कौतुक केल गेल. याच मालिकेतील लोकप्रियतेने त्याला बॉलिवूडमध्ये प्रवेश मिळवून दिला.
सन २०१३ मध्ये आलेल्या ‘काई पो छे” चित्रटातून त्याने बॉलिवूडमध्ये पाउल ठेवले. यानंतर त्याने ‘शुद्ध देसी रोमांस’, ‘राब्ता’, ‘केदारनाथ’, ‘पीके’, ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. त्याच्या मृत्यूनंतर ‘दिल बेचारा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. जो प्रेक्षकांना खूप आवडला होता.
हे पाहिलं का? प्रेक्षकांवर अभिनयाची जादू करणारे ‘आशिकी’मधील कलाकार कुठे आहेत?
सुशांतने १४ जून, २०२० रोजी त्याच्या राहत्या घरात आत्महत्या केली होती. ज्यामुळे सगळीकडे जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती. अत्यंत प्रतिभावान असलेल्या या नवोदित कलाकाराच्या जाण्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात होती.
सुशांतबद्दल काही रंजक माहिती-
- विशेष म्हणजे सुशांतने ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात ‘हेलिकॉप्टर शॉट’ व्यवस्थित मारण्यासाठी दिवसाला तब्बल २२५ वेळा सराव करत होता.
- चंद्राच्या जमिनीचा तुकडा विकत घेतल्यानंतर, सुशांत हा असा पराक्रम गाजवणारा पहिला अभिनेता ठरला होता. त्याच्याव्यतिरिक्त सुपरस्टार शाहरुख खानला यापूर्वी चंद्रावर जमीन भेट देण्यात आली आहे.
- अभिनेत्याकडे उड्डाणाचा परवाना होता. त्याच्या विश लिस्टमधील पहिली गोष्ट लक्षात घेता, सुशांतने इंस्टाग्रामवर घोषणा केली होती की, त्याला त्याचा फ्लाइंग लायसन्स मिळाले आहे. शिवाय त्यात ‘बोईंग ७३७’ ब्युटी खरेदी करण्याचाही उल्लेख होता.
- सुशांतच्या आवडत्या कलाकारांमध्ये डॅनियल डे लुईस, रायन गोसलिंग आणि शाहरुख खान यांचा समावेश होता.
- सुशांतचे टोपणनाव गुड्डू होते.
हेही वाचा-