Saturday, July 27, 2024

सुशांत सिंग राजपूतला खूपच आवडायची आपली ‘ही’ शानदार कार; एकेकाळी पाहायचा विकत घेण्याचे स्वप्न

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान मिळवले होते. सुशांत जरी आज आपल्यात नसला, तरीही तो सर्वांच्या मनात अजूनही जिवंत आहे. परंतु सुशांतचा अप्रतिम प्रवास सर्वांना नेहमीच प्रेरणा देणारा आहे. सुशांतला नेहमी शाही जीवन जगायला आवडायचे. मुंबईत आल्यानंतर अभिनेत्याने खूप संघर्ष केला आणि मालिकेत मुख्य भूमिकेत आपले स्थान निर्माण केले. 2009 ते 2011 पर्यंत अभिनेत्याने खूप मेहनत केली आणि चित्रपटात आपले पहिले पाऊल ठेवले. चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर सुशांतला पैसा, प्रसिद्धी सर्वकाही मिळाले. सुशांतने प्रथम मुंबईत स्वतःसाठी बीएमडब्ल्यू कार खरेदी केली. सुशांतचे स्वप्न होते की, स्वत: साठी एक दमदार कार असावी. 

बीएमडब्ल्यू कार घेतल्यानंतर त्याने आपल्या स्वप्नातील कारही स्वतःसाठी खरेदी केली. सुशांतला लाँग ड्राईव्हला जायला आवडत होते. हे त्याच्या सर्व मित्रांना माहित होते की, सुशांतला एक्सप्लोर करायला आवडते. ज्यामुळे त्याने स्वतःसाठी 3 कोटींमध्ये मासेराती क्वात्रोपोर्ते कार बुक केली होती. बॉलिवूडमध्ये फार कमी कलाकार आहेत ज्यांच्याकडे ही सुपरकार आहे. त्याचबरोबर दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अभिनेता अजय देवगण यांनाही मासेराती ब्रँड खूप आवडतो आणि या ब्रँडची कारही त्यांच्याकडे आहे.

सुशांत नेहमी ही निळी मासेराती गाडी त्याच्या घरातून त्याच्या फार्म हाऊसवर घेऊन जात असे. जिथे तो या कारच्या राईडचा खूप आनंद घेत असायचा. ही कार सुशांतने त्याचा ‘राबता’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर विकत घेतली होती. सुशांतला स्वप्न पडले की, त्याच्याकडे ही कार आहे. सुशांतने वयाच्या 28व्या वर्षी त्याचे हे स्वप्न पूर्ण केले होते. सुशांत सिंग राजपूतचे निधन बॉलिवूडसाठी अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटना होती.

त्याचबरोबर दिग्दर्शक शेखर कपूर यांना सुशांतसोबत ‘पाणी’ हा चित्रपट बनवायचा होता. सुशांतच्या मृत्यूनंतर शेखर कपूर यांनी सुशांतबद्दल मोकळेपणाने आपली भावना व्यक्त केली होती. शेखर कपूर म्हणाले होते की, जेव्हाही ते सुशांतसोबत बोलायचे, तेव्हा त्यांना असे वाटायचे की, ते एका खूप मोठ्या शास्त्रज्ञाशी बोलत आहेत. याच कारणामुळे त्यांना फक्त सुशांतसोबत ‘पाणी’ हा चित्रपट बनवायचा होता. खरंतर शेखर पाण्याच्या समस्येवर हा चित्रपट बनवणार होते. जिथे त्यांना या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना या गोष्टीची जाणीव करून द्यायची होती की, लवकरच पृथ्वीवरील स्वच्छ पाणी संपणार आहे. त्याचबरोबर पेट्रोलपेक्षा पाणी महाग होणार आहे, पण हा प्रकल्प कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. सुशांतने 2014 मध्ये या चित्रपटासाठी साईन देखील केले होते, पण हा चित्रपट कधीच बनला नाही.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तरुणांना स्वप्न बघण्याची प्रेरणा देणारा सुशांत सिंग राजपूत,वाचा बॉलिवूडने गमावलेल्या हरहुन्नरी कलाकाराचा प्रवास
अगदी दृष्ट लागेल असे होते सुशांत आणि रियाचे नाते, वाढदिवशी रियाने केला अनसीन व्हिडिओ शेअर

हे देखील वाचा