लोकप्रिय शो “फ्रेंड्स: द रियुनियन” हा एका वेगळ्या रूपात आता प्रेक्षकांसमोर येणार आहे. या शोचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. फ्रेंड्सच्या टिझरची सुरुवात मैत्रीच्या एका अनोख्या कहाणीपासून होत आहे. या शोमध्ये जेनिफर एनीस्टन, कर्टेनी कॉक्स, लिसा कुड्रो, मॅथ्यू पेरी, डेविड शिमर यांची मैत्री पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फ्रेंड्स सगळ्यात आधी 1994 पासून 2004 पर्यंत एनबीसीवर दाखवला गेला होता. याची निर्मिती डेविड क्रेन, मार्टा कॉफमॅन यांनी केली होती. या सीरिजला 2002 मध्ये प्राईम टाईम बेस्ट कॉमेडीसाठी ‘एम्मी’ हा अवॉर्ड देखील मिळाला होता.
फ्रेंडस या शोच्या टिझरची सुरुवात सगळ्या कलाकारांच्या एका बॅक क्लिपने होते. या क्लिपची सुरुवात या शोचे गाणे ‘आय विल बी देअर फॉर यू’ या गाण्याने होते. निर्मात्यांनी या शोचे नाव देखील ट्रेडमार्क स्टाईलमध्ये दिले आहे. या शोमधील जेनिफर एनीस्टनचा जबरदस्त लूक पाहून त्याचे चाहते खुश झाले आहेत.
जेनिफरने फ्रेंड्स या शोची माहिती इंस्टाग्रामवर टिझर शेअर करून दिली आहे. हा टिझर शेअर करून त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “27 मेला या शोचा प्रीमियर एचबीओ मॅक्सवर दिसणार आहे. तुम्ही हा शो बघण्यासाठी उत्साहित आहात का??”
यावर एका युजरने प्रतिक्रिया दिली आहे की, “या शोसाठी मी भावनिक आहे.” दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, “मी या शो शिवाय बाकी कोणताच विचार करत नाहीये.” जेनिफर यांनी केलेल्या या पोस्टला 1 कोटी 95 लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहे. यावरून या शोच्या लोकप्रियतेचा अंदाज आपण लावू शकतो.
या टिझरला खूप प्रतिक्रिया येत आहेत. तसेच या शोमधील जेनिफर यांचा डायलॉग देखील वारंवार सगळे शेअर करत आहेत. हाती आलेल्या माहिती नुसार, या शोच्या प्रीमियरच्या निमित्ताने लेडी गागा, जस्टिन बिबर, सिंडी क्रोफोर्ड, लॅरी हॅकिन, जेम्स मायकल टेलर, थॉमस लेनॉन, क्रिस्टिना पिकल्स हे सगळे उपस्थित असणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सरोज खान यांच्या आठवणीत ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित झाली भावुक; म्हणाली…
-व्हिडिओ: घरी ईद साजरी होत असताना ‘भाईजान’ सलमान खान पोहोचला कोरोना लसीचा दुसरा डोस घ्यायला