बॉलिवूडमध्ये बरेच स्टार आणि सुपरस्टार्स झाले आहेत. पण काही कलाकार स्टारडमपेक्षा गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करतात. ते अभिनय कौशल्यासह स्वत: ची ओळख प्रस्थापित करणे अधिक पसंत करतात. त्यापैकी एक अनुपम खेर आहेत, ज्यांना जगाने एका नव्हे, दोन नव्हे तर 500 वेगवेगळे पात्र साकारताना पाहिले आहे. तुम्हाला सर्वांना अनुपम खेरबद्दल बरेच काही माहित असेल. परंतु आज आम्ही अशा गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत, ज्या तुम्हाला क्वचितच माहित असतील.
सन 1955 मध्ये 7 मार्च रोजी शिमला येथे जन्मलेल्या, 68 वर्षीय अभिनेत्याला हे यश, नाव आणि कीर्ती सहज मिळाली नाही. तर या मागे अपयशाच्या अनेक जखमा, जीवनातील धडपड आणि प्रचंड मेहनत आहे. याची सुरूवात बऱ्याच वर्षांपूर्वी, ते नववीत शिकत असताना झाली होती. तेव्हा अनुपमला त्यांच्या भविष्याबद्दल काहीच अंदाज नव्हता. त्यांना सिनेमा आणि चित्रपटाच्या जगाची माहिती तर नव्हतीच, पण ते या सर्व बाबींमध्ये थोडे कच्चेही होते.
अनुपम खेर यांच्या वडिलांचे नाव पुष्कर नाथ खेर आणि आईचे नाव दुलारी खेर आहे. त्यांचा एक भाऊही आहे राजू खेर, जे कधीकधी सोशल मीडिया व्हिडिओमध्ये दिसतात आणि अगदी त्यांच्यासारखेच दिसतात. तर अनुपम खेर नववीत शिकत असताना, त्यांना शाळेत नाटक करण्याची संधी मिळाली होती. पण समस्या अशी होती की, त्यांना डायलॉग लक्षातच राहत नव्हता. फक्त या कारणास्तव, तो रोल त्यांच्या हातातून दुसर्याकडे गेला.
बऱ्याच वर्षांनंतर जेव्हा त्यांनी चित्रपटांमध्ये पाऊल ठेवले, तेव्हा त्यांनी प्रचंड संघर्षांचा काळ पाहिला. असे असूनही त्यांनी हार मानली नाही. कारण त्यांना आजोबाचा एक सल्ला आठवला की, “पहिल्यापासुनच पाण्याने भिजलेल्या माणसाने पावसाला घाबरू नये’. ही एकमेव गोष्ट आहे, ज्याने त्यांना धैर्य दिले. असे म्हणतात की, यश न मिळाल्यामुळे निराश होऊन अनुपम खेर यांनी मुंबईहून निघण्याची तयारी केली होती. पण या एका गोष्टीने त्यांना तिथे राहण्याचे धैर्य दिले आणि ते तिथेच राहिलेही.
अनुपम खेरसाठी मुंबईत राहणे फायदेशीर ठरले. धैर्याने काम केल्यानंतर, त्यांना महेश भट्ट यांच्या ‘सारांश’ चित्रपटाद्वारे यश मिळाले. हा चित्रपट 25 मे 1984 रोजी प्रदर्शित झाला होता. तसे तर त्यांनी 1982 मध्ये ‘आगमन’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, परंतु त्यांना ओळख ‘सारांश’ चित्रपटापासून मिळाली. यानंतर खेर यांनी आपल्या कारकिर्दीत एकापेक्षा एक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली.
चित्रपटांव्यतिरिक्त अनुपम खेर राजकीय वक्तृत्वाविषयी खूप चर्चेत राहिले आहेत. असहिष्णुतेसाठी त्यांनी बॉलिवूडमधील अनेकांना लक्ष्य केले आहे. याशिवाय ते दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात एनएसडीचे संचालकही होते. सध्याच्या एनडीए सरकारच्या काळात त्यांना फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन संस्थेचे अध्यक्षही केले गेले होते. परंतु त्यांनी काही कारणास्तव या पदाचा राजीनामा दिला.
बरेच राजकीय वक्तव्य करूनही अनुपम खेर यांनी म्हटले आहे की, त्यांना राजकारणात रस नाही. तसेच, त्यांची पत्नी किरण खेर चंडीगडमधील भाजपा खासदार आहेत. याक्षणी, त्या कर्करोगाशी झुंज देत आहे. 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या अनुपम खेर यांना दोनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांना 2004 मध्ये पद्मश्री आणि 2016 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
अनुपम खेरबद्दल काही किस्सेही प्रसिद्ध आहेत. त्यातील एक म्हणजे, 1992 मध्ये अनुपम खेर यांनी एका मासिकाच्या रिपोर्टरला चापट मारली होती. कारण रिपोर्टरने त्यांच्यावर शोषणाचा आरोप करत एक बातमी प्रकाशित केली होती. त्याचप्रमाणे त्याच्याबद्दल आणखी एक किस्सा आहे, जो क्वचितच लोकांना माहित असेल. तो किस्सा म्हणजे त्यांनी महेश भट्टला शाप दिला होता.
वास्तविक, ‘सारांश’ साठी खेरने सहा महिने कठोर परिश्रम घेतले होते, परंतु शेवटच्या प्रसंगी महेश भट्ट यांनी त्यांना काढून संजीव कुमार यांना घेतले. यानंतर अनुपमला मोठा धक्का बसला आणि त्यांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला. पण त्याआधी त्यांनी महेश भट्ट यांच्या घरी जाऊन रडत रडत शाप दिला. मात्र त्यानंतर महेश भट्ट यांनी त्यांनाच साइन केले.(anupam kher interesting facts he cursed mahesh bhatt and slapped a reporter received two national awards)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पहाटे 2 वाजता प्राइवेट प्रॉपटीमध्ये पॅपराझींच्या एंट्रीवर सैफ अली खान म्हणाला, ‘कुठे आहे मर्यादा?…’
आमिर खानच्या बोलण्यावर संतापले होते मोगॅंबो, नेमके काय होते कारण? एकदा जाणून घ्याच










