Monday, June 23, 2025
Home हॉलीवूड प्रेक्षकांना हे पाच चित्रपट पाहण्याची होती मोठी इच्छा, परंतू ‘या’ कारणामुळे भारतात घालण्यात आली होती बंदी

प्रेक्षकांना हे पाच चित्रपट पाहण्याची होती मोठी इच्छा, परंतू ‘या’ कारणामुळे भारतात घालण्यात आली होती बंदी

चित्रपट प्रेमींमध्ये जेवढी क्रेझ बॉलिवूड मधील चित्रपटांची असते तेवढीच क्रेझ हॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील आहे. दरवर्षी हॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित होतात. ज्यांना बघण्यासाठी सगळेच खूप उत्सुक झालेले असतात. हॉलिवूड चित्रपटांमध्ये ऍक्शन, रोमान्स या गोष्टी मोठ्या प्रमाणात असल्याने प्रेक्षक देखील उत्साहाने बघतात. तसेच या चित्रपटात अनेक आक्षेपार्ह शब्द वापरले जातात. बर्याच वेळा असे शब्द हे त्यांच्या कथानकाचा भागच असतो. परंतू भारतात मात्र काही गोष्टींवर बंदी आहे. त्यामुळे अशा चित्रपटांतील शब्द, त्यातील विषय किंवा अन्य गोष्टींमुळे भारतात हे सिनेमे दाखवले जात नाहीत.

आज आम्ही तुम्हाला काही हॉलिवूड चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, जे चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक होते. पण त्या चित्रपटांना बॅन केल्यामुळे प्रेक्षक नाराज झाले होते.

आई स्पिट ऑन योर ग्रेव (1978)
मीर जर्ची यांनी 1978 मध्ये दिग्दर्शन केलेला ‘आई स्पिट ऑन योर ग्रेव’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित केला नव्हता. हा चित्रपट प्रदर्शित न होण्यामागचे कारण होते की, या चित्रपटाची कहाणी आणि चित्रपटातील सीन्स. केमिल केटोन यांचा हा चित्रपट एका रेप आणि रिवेंज ड्रामा यावर आधारित होता. त्यामुळे हा चित्रपट भारतात प्रदर्शित केला नव्हता.

केनिबल फेरोक्स (1981)
केनीबल फेरोक्स हा चित्रपट 1981 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मनुष्य आणि जनावरे यांच्यातील हिंसा दाखवल्या होत्या. या चित्रपटातील काही भयावह दृश्यांमुळे हा चित्रपट केवळ भारतात नव्हे तर अन्य 31 देशांमध्ये बॅन केला होता.

इंडियाना जोन्स एंड द टेम्पल डूम (1984)
इंडियाना जोन्स एंड द टेम्पल डूम या चित्रपटात भारतीय संस्कृती आणि सभ्यता या विरोधात काही सीन्स होते. त्यामुळे हा चित्रपट भारतात प्रदर्शित केला नव्हता. हेरीसन फोर्ड हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते.

द ह्यूमन सेंटिपेड (2019)
द ह्यूमन सेंटिपेड या चित्रपटाची कहाणी एका जर्मन सर्जनवर आधारित होती. जो तीन पर्यटकांचे अपहरण करतो. टॉम सिक्स यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटातील काही सीन्समुळे हा चित्रपट बॅन केला होता. तसेच ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन या देशात देखील हा चित्रपट बॅन केला होता.

द गर्ल विथ द ड्रॅगन टॅटू (2011)
द गर्ल विथ द ड्रॅगन टॅटू हा चित्रपट भारतात प्रदर्शित न करण्यामागचे कारण म्हणजे या चित्रपटातील अनेक छळ केलेली दृश्य. हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला असता. पण या चित्रपटाचे दिग्दर्शक डेविड फिंचर यांनी चित्रपटातील हे सीन्स हटवण्यासाठी साफ नकार दिला.

हेही वाचा-

-‘मला तुमची खूप आठवण आली’, वडिलांच्या आठवणीत भावुक झाली अभिनेत्री; इंस्टाग्रामवर शेअर केली भावनिक पोस्ट

‘मित्रांनी पाठीवर वार केले आहेत’ मराठमोळ्या श्रेयस तळपदेचा चित्रपटसृष्टीबद्दल धक्कादायक खुलासा

ईदच्या दिवशी गौहर खानला आली वडिलांची आठवण, वडिलांचा फोटो शेअर करून लिहिली भावुक पोस्ट

हे देखील वाचा