गोविंदाचे वैयक्तिक आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सध्या सुरु असलेल्या गणपती उत्सवादरम्यान अनेक कलाकार हे लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी जात आहेत. याच दरम्यान अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री कोमल राणी ही मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजाला भेट देण्यासाठी गेले होते, त्यावेळचे त्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. आणि ते एकत्र दिसल्याने त्याच्या कथिक नात्याबाबतच्या चर्चाना पुन्हा उधान आले आहे. आणि यावर आता राखी सांवतने तिची प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेत्री राखी सांवतने यावरचा एक व्हिडोओ शेअर केला आहे. आणि त्यामध्ये तिने म्हणले आहे की, गोविंदाजीनी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आपल्या पत्नी सुनीता आहुजाला सोबत न्यायला हवे होते. राखीने तिच्या खास शैलीत म्हटले आहे की, गोविंदाने सुनीतासोबतच्या नात्यातील कटुता दूर करून एकत्र यावे. आणि ज्या महिलेसोबत गोविंदाने 40 वर्षे घालवली आहेत, तिला गणपती दर्शनासाठी घेऊन जाणे हे योग्य ठरले असते. तसेच तिने हे देखील म्हणले की, तुम्ही दुसऱ्याच्या पत्नीला का घेउन फिरत आहेत.
वास्तविक, गणपती उत्सवादरम्यान गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकर लालबागच्या राजाला भेट देताना दिसले होते. तसेच त्या दोघाच्या नात्याबाबत काही दिवसांपासुन चर्चा सुरु आहेत, मात्र त्यानी दोघांनी ते नात्यात असल्याचे आता पर्यत जाहीर केले नाही. पण लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान कोमलच्या कपाळावर आणि भांगेत दिसलेल्या कुंकवान सोशल मिडीयावर पुन्हा एकदा त्याच्या नात्याच्या चर्चाना उधान आले आहे.
पण काही दिवसापुर्वी सुनीता यांनी राखी (rakhi)सावंतसोबतच्या संभाषणात गोविंदा आणि कोमलच्या लग्नावर चर्चा केल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, गोविंदाचे व्यवस्थापक, शशी सिन्हा यांनी हे दावे फेटाळून लावले. त्यांनी स्पष्ट केले की गोविंदाच्या दुसऱ्या लग्नाचा प्रश्नच उद्भवत नाही.
हेही वाचा
रणबीरचा धांसु अवतार, लव्ह अँड वॅारचा जबरदस्त फर्स्ट लुक रिलीज










