बऱ्याच प्रतीक्षेनंतर, जुलैमध्ये बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, ज्यांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. जुलैमध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारे अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ज्यामध्ये राजकुमार रावचा मलिक, सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर स्टारर परम सुंदरी तसेच इतर अनेक चित्रपटांचा समावेश आहे.
मलिक
राजकुमार रावचा मलिक ११ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. भूल चुक माफ नंतर, आता राजकुमार राव त्याच्या नवीन चित्रपटात पूर्णपणे वेगळ्या शैलीत दिसणार आहे.
सैयारा
सैयारा १८ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. अनन्या पांडेचा चुलत भाऊ अहान पांडे या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
परम सुंदरी
सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर स्टारर ‘परम सुंदरी’ हा चित्रपट २५ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आणि जान्हवी यांच्यातील केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
मेट्रो इन दिनो…
मेट्रो हा मल्टीस्टारर चित्रपट ४ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. यात सारा अली खान, आदित्य रॉय कपूर, कोंकण सेन शर्मा, फातिमा सना शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
आँखों की गुस्ताखियां
विक्रांत मेस्सी आणि शनाया कपूर यांचा अभिनय असलेला ‘आँखों की गुस्ताखियां’ हा चित्रपट ११ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाद्वारे शनाया कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
महावतार नरसिंह
महावतार नरसिंह २५ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अश्विन कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
अरबाज खान पुन्हा बनणार बाप; मिडीयाने टिपले पत्नी शूराचे बेबी बंप…