Friday, August 8, 2025
Home अन्य कपिलच्या कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार; जबाबदारी घेत गँगस्टर गोल्डी म्हणाला, ‘पुढच्या वेळी मुंबईत…’

कपिलच्या कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार; जबाबदारी घेत गँगस्टर गोल्डी म्हणाला, ‘पुढच्या वेळी मुंबईत…’

प्रसिद्ध विनोदी कलाकार कपिल शर्माच्या (Kapil Sharma) कॅनडास्थित ‘कॅप्स कॅफे’वर एका महिन्याच्या आत दुसऱ्यांदा गोळीबार झाला आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की लॉरेन्स बिश्नोई टोळीचा असल्याचा दावा करणारा गँगस्टर गोल्डी ढिल्लनने या गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे. गोल्डीने सोशल मीडिया पोस्टद्वारे हा दावा केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. परंतु आतापर्यंत या हल्ल्यात कोणत्याही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

गोल्डी ढिल्लनच्या नावाने एक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गुंडाने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे, “जय श्री राम. सर्व भावांना सत श्री अकाल, राम राम. लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित गोल्डी ढिल्लनने आज सरे येथील कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेमध्ये झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे. आम्ही त्याला फोन केला, पण त्याने फोन उचलला नाही, म्हणून आम्हाला कारवाई करावी लागली. जर त्याने अजूनही प्रतिसाद दिला नाही तर आम्ही लवकरच मुंबईत पुढील कारवाई करू.” या दुसऱ्या हल्ल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती गोळ्या झाडताना दिसत आहे.

गेल्या महिन्यात १० जुलै रोजी कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेमध्ये गोळीबार झाला होता. त्याचा व्हिडिओही समोर आला होता. हल्लेखोराने कारमधून पिस्तूल काढून १० ते १२ राउंड गोळीबार केला. खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग लड्डीने शेवटच्या गोळीबाराची जबाबदारी घेतली होती. हरजीत सिंग लड्डीचा एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत समावेश आहे आणि तो बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंधित आहे. लड्डीने कपिल शर्माच्या काही जुन्या विधानाच्या आधारे हा हल्ला केल्याचे म्हटले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

कमल हसन यांनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट, कीलाडीच्या पुरातनतेला मान्यता मिळण्याचा मुद्दा केला उपस्थित
सुनील दर्शन करणार तीन नवीन चेहरे लाँच; म्हणाले, ‘स्टार किड्सना संघर्ष माहित नाही’

हे देखील वाचा