बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियांका चोप्राने केवळ भारतातच नाही, तर परदेशातही तिच्या अभिनयाचा आणि सौंदर्याचा डंका वाजवला आहे. तिचे चाहते हे फक्त भारतातच नाही तर परदेशातही पसरले आहेत. सध्या प्रियांका पुन्हा एकदा बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत चर्चेचा विषय ठरत आहे. याचे कारणही तसेच आहे.
नुकताच अमेरिकेत संपन्न झालेल्या ‘बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड्स २०२१’ मध्ये प्रियांकाने तिचा पती निक जोनाससोबत हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. यावेळी प्रियांका असलेला लूक सध्या सर्वच लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर देखील प्रियांकाचा लूक मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
‘बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड्स २०२१’ दरम्यान ‘देली गर्ल’ प्रियांका अतिशय बोल्ड अशा न्यूड रंगाच्या शिमरी थाय- हाय स्लिट आऊटफिटमध्ये दिसली. या ड्रेसमध्ये प्रियांका अतिशय बोल्ड आणि ब्युटिफुल दिसत होती. यावेळी तिच्यासोबत तिचा पती निक जोनास देखील होता. निकने हिरव्या रंगाचे जॅकेट, शर्ट आणि पँट घातली होती.
या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन निक जोनासने केले. यावेळी प्रियांका फक्त निक जोनासला पाठिंबा देण्यासाठी न येता तिने एक पुरस्कार देखील प्रेझेंट केला. या पुरस्कारादरम्यान फक्त आणि फक्त प्रियांका आणि निक या क्यूट जोडप्याचीच चर्चा होती.
यावर्षी प्रियांकाने न्यूयॉर्कमध्ये सोना नावाचे भारतीय पदार्थांचे एक हॉटेल देखील सुरु केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…










