भोजपुरी सिनेमाची प्रसिद्ध अभिनेत्री यामिनी सिंगला आज कोणत्याही वेगळ्या परिचयाची गरज नाही. भोजपुरी चित्रपटसृष्टीत तिने बरेच नाव कमावले आहे. तिने अभिनयासोबतच आपल्या अदांनी देखील चाहत्यांना वेड लावले आहे. यामिनी सिंग सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिला जवळपास ३ लाखांहून अधिक युजर्स फॉलो करतात, जे सतत तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना दिसतात. यामिनी सिंगही तिच्या चाहत्यांना कधी निराश करत नाही आणि नेहमी सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट करत राहते.
यामिनी सिंग सतत इंस्टाग्रामवर तिचे रील व्हिडिओ पोस्ट करते. ज्यामध्ये ती वेगवेगळ्या भोजपुरी गाण्यांवर परफॉर्म करताना दिसते. यामिनीच्या चाहत्यांनाही तिचे व्हिडिओ खूप आवडतात, पण एका चाहत्याची तिच्याबद्दल तक्रार आहे!
वास्तविक, यामिनी सिंगने नुकताच तिचा एक इंस्टाग्राम रील व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये ती पांढऱ्या रंगाच्या नाईट ड्रेसमध्ये दिसली आहे. या व्हिडिओमध्ये यामिनीने अरविंद अकेला कल्लूच्या ‘ब्लाउज के बटन’ या भोजपुरी गाण्यावर परफॉर्म केला आहे. नेटकऱ्यांनी तिच्या एक्सप्रेशन्सचे आणि डान्सचे खूप कौतुक केले. परंतु तिच्या एका चाहत्याने तिला एक वेगळाच प्रश्न विचारला आहे.
या व्हिडिओखाली कमेंट करून चाहत्याने विचारले की, “मॅम, तुम्ही प्रत्येक रील व्हिडिओ याच कपड्यांमध्ये का बनवता? तसं तुम्ही अभिनय चांगला केला आहे.”
चाहत्याच्या या प्रश्नावर नाराज न होता अभिनेत्रीने उत्तर दिले की, “मी त्याच कपड्यांमधे दिसते, कारण मी नेहमी व्हिडिओ नाही बनवत. फक्त रील व्हिडिओ तयार करण्यासाठी तयार होणे, मला बरोबर नाही वाटत. जेव्हा मला महत्वाचे काम असते, तेव्हाच मी लिपस्टिक, काजळ लावून तयार होते. मला माहित आहे की, हे ऐकून तुम्हाला मी आळशी वाटेल. पण मला तयार होऊन रील व्हिडिओ बनविण्याचा मूर्खपणा आवडत नाही.”
यामिनी सिंगने १७ मे रोजी तिचा वाढदिवस साजरा केला होता. भोजपुरी इंडस्ट्रीतील लोकांनी तिला भरभरून शुभेच्छाही दिल्या. यामिनी सिंग आणि अरविंद अकेला कल्लूच्या जोडीला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळते. दोघांची बरीच गाणी खूप हिट ठरली आहेत. ‘कहिया ले मम्मी बनैबा’, ‘चुम्मा जब दोगी’, ‘पहले मम्मी को जाके मनाना’ ही गाणी दोघांच्या दमदार जोडीमुळे सुपरहिट झाली आहेत. याशिवाय कल्लू आणि यामिनीने ‘प्यार तो होना ही था’, ‘छलिया’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…