टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री अवनीत कौर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमीच तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. अशातच तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. खरं तर नुकतेच तिचे इंस्टाग्रामवर 20 मिलियन फॉलोवर्स झाले आहेत. याच्या सेलिब्रेशनचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने पांढरा टॉप आणि जीन्स घातली आहे. तसेच आजूबाजूला आणि मागील भिंतीला सजावट केलेली दिसत आहे. तिच्या समोर 5-6 केक ठेवलेले आहेत. या सोबत तिने एक कँडिड पोझ देत फोटो काढला आहे. तसेच तिने रील बनवली आहे. ती देखील सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
अवघ्या 19 वर्षाच्या अवनीतने टीव्हीवरील सूनेचे पात्र खूप चांगल्या रीतीने निभावले आहे. तिने या बाबत हिना खान, श्वेता तिवारी या अभिनेत्रींना मागे सारले आहे.
तिने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिचा लूक खूप वेगळा दिसत आहे. या वेस्टर्न ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या चाहत्यांना तिचे हे लेटेस्ट फोटोशूट खूपच आवडले आहे. तिचे चाहते या फोटोवर कमेंट करून तिच्या या बोल्ड लूकचे कौतुक करत आहेत. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर कहर करताना दिसत आहे.
नुकतीच तिने टीव्हीवरील मालिका ‘अलादिन: नाम तो सूना होगा.’ ही मालिका सोडली आहे. यामध्ये तिने राज कुमारी यास्मिनचे पात्र निभावत होती. तिच्या या पात्राने तिला खूप लोकप्रियता मिळाली. यामुळेच तिच्या फॅन फॉलोविंगमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. तिने मालिकांव्यतिरिक्त सिनेमांमध्येही काम केले आहे. यामध्ये ‘मर्दानी’, ‘मर्दानी २’ या सिनेमांचा समावेश आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…