Wednesday, February 4, 2026
Home बॉलीवूड हिंदू धर्मावरील विधानामुळे अभिनेत्री भोवऱ्यात, एकाच ओळीने पेटला होता मोठा वाद

हिंदू धर्मावरील विधानामुळे अभिनेत्री भोवऱ्यात, एकाच ओळीने पेटला होता मोठा वाद

बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आपल्या व्हर्सेटिलिटी, बोल्ड भूमिका आणि प्रभावी स्क्रीन प्रेझेन्ससाठी ओळखल्या जातात. राम गोपाल वर्मा यांच्या ‘रंगीला’ (1995) या चित्रपटामुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली आणि त्या युथ आयकॉन ठरल्या. त्यानंतर ‘सत्या’, ‘कौन’, ‘भूत’ आणि ‘एक हसीना थी’ अशा चित्रपटांमधील दमदार अभिनयामुळे समीक्षकांकडूनही त्यांना भरभरून दाद मिळाली. रूढ चौकटी मोडणाऱ्या आणि ताकदीच्या स्त्री भूमिका साकारण्यासाठी उर्मिला ओळखल्या जातात. मात्र, काही वादग्रस्त विधानांमुळेही त्या चर्चेत राहिल्या आहेत.

सुमारे सहा वर्षांपूर्वी पुण्यातील एका कार्यक्रमात उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar)यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येचा उल्लेख करताना वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी म्हटले होते की गांधीजींची हत्या करणारा व्यक्ती हिंदू होता, तसेच एका टीव्ही शोमध्ये त्यांनी “हिंदू धर्म हा जगातील सर्वात हिंसक धर्म आहे” असे विधान केल्याचा आरोप झाला. या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला.

या विधानानंतर भाजप नेते सुरेश नाखुआ यांनी उर्मिला मातोंडकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीत, हिंदू धर्माबाबत केलेल्या वक्तव्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले होते.

उर्मिला मातोंडकर यांनी बालकलाकार म्हणून ‘मासूम’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. 90च्या दशकात त्यांनी उत्कृष्ट नृत्यकौशल्य आणि अभिनयाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि त्या, त्या काळातील सर्वात यशस्वी अभिनेत्रींमध्ये गणल्या जातात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

हे देखील वाचा