Saturday, February 28, 2026
Home बॉलीवूड सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आवडतात का? तर हा 127 मिनिटांचा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट नक्की पहा

सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आवडतात का? तर हा 127 मिनिटांचा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट नक्की पहा

आज काल सस्पेन्स थ्रिलर हे चित्रपट प्रेक्षक अधिक आवडीने पाहत आहेत. तसेच ओटीटी आल्यापासून याचा क्रेझ वाढत आहे. कारण या सिरीजचा टीव्ही, मोबाईल आणि घरी बसून सोयीनुसार हे चित्रपट आणि सिरीज पाहू शकतात. जर तुम्हाला अशा सिरीयल चित्रपट आवडत असतील तर, तुम्ही नक्कीच हा चित्रपट बघा. कारण “अंधाधुन” आणि “दृश्यम” या चित्रपटाना मागे टाकले आहे.

तर तो  चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या “रमन राघव 2.0” बद्दल बोलत आहोत. हा चित्रपट “इंडियाज जॅक द रिपर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमन राघव नावाच्या सिरीयल किलरच्या जीवनावर आधारित होता. रमन राघव हा 1960 च्या दशकात मुंबईत सक्रिय असलेला एक धोकादायक सिरीयल किलर होता. 1968 मध्ये त्याने फूटपाथवर झोपलेल्या लोकांना लोखंडी रॉडने मारले. त्याने 40 हून अधिक खून केले. रमन राघवला पॅरानॉइड स्किझोफ्रेनियाचा आजार होता, ज्यामुळे त्याची मृत्युदंडाची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली आणि 1995 मध्ये त्याचे येरवडा तुरुंगात निधन झाले.

2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या “रमन राघव 2.0” मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीने विकी (vikki)कौशलसोबत एका सायको किलरची भूमिका केली होती. कौशलने चित्रपटात पोलिसाची भूमिका केली होती. हा तो काळ होता जेव्हा विकी इंडस्ट्रीमध्ये फार मोठे नाव नव्हते. नवाजुद्दीन सिद्दीकीने चित्रपटात रमन नावाच्या सिरीयल किलरची भूमिका करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. विकीची भूमिका, एसीपी राघवन, रमनला पकडण्याचा प्रयत्न करत आहे. शोभिता धुलिपाला देखील चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. चित्रपटाला IMDb वर 7.3 रेटिंग मिळाले आहे. तर हा चित्रपट  तुम्ही तो Zee5 आणि Netflix वर पाहू शकता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

दररोज पत्र लिहिणारी चाहतीच ठरली विजयची जीवनसाथी, संगीताचा हा प्रवास घ्या जाणून

 

हे देखील वाचा