Monday, October 12, 2026
Home › बॉलीवूड › वयाच्या १७व्या वर्षी करिअरला सुरुवात, जाणुन घ्या एकता कपूरचा संघर्षमय प्रवास

वयाच्या १७व्या वर्षी करिअरला सुरुवात, जाणुन घ्या एकता कपूरचा संघर्षमय प्रवास

एकता कपुर ही एक चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय निर्मीतीकार आहे, तिने अनेक उत्तम मालिकाची निर्मीती केली आहे. आणि प्रेक्षकांनी कडुन तिच्या या मालिका आणि चित्रपटांना खुप प्रेम मिळाले.  एकता कपुर हिने नेहमीच प्रेक्षकांना काय पाहयला आवडेल यांचा विचार करुन मालीकांची निर्मीती केली. तसेच एकताने आतापर्यत एकुण 130 पेक्षाही अधिक मालीकांची निर्मीती केली आहे.  नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, एकता कपूर यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला केलेल्या त्यागांची आठवणी सांगितल्या आहेत.

एका मुलाखती दरम्यान एकताला (Ekta)विचारले की, एवढ्या सगळ्या मालिका आणि शो पाहण त्यांना कसे शक्य झाले, असे विचारल्या ती म्हणली की, तेव्हा माझे असे स्वत:चे आयुष्य नव्हते पण मला ते खुप आवडायचे मी प्रत्येक एपिसोड पाहायचे. मी घरी यायचे नाही, मी सहा महिने घरी आले नाही,या बाबत कोणालाच माहीत नव्हत. मी फक्त अंघोळ आणि 2 तास आराम करायला घरी जायचे आणि परत कामावर यायचे माझा टुथब्रश मी ऑफिसमध्येच ठेवलेला होता. मी तिथेच झोपायचे. आणि यामुळे मी माझे व्ययक्तिक आयुष्य बाजुला ठेवले होते.

एकाताने वयाच्या 17 व्या वर्षी कामाला सुरुवात केली, आणि ती पुढे भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात प्रसिद्ध निर्मात्यापैकी एक बनली. तिने आपल्या कुटुंबासोबत बालाजी टेलीफिल्म्सची स्थापना केली आणि कंपनीचा पहिला मोठा टेलिव्हिजन हिट ‘हम पाच’ हा विनोदी कार्यक्रम होता, एकताने नंतर अनेक शो तयार केले जे घरोघरी नावारूपास आले, जसे की क्यूंकी सास भी कभी बहू थी, कहानी घर घर की, कसौटी जिंदगी के, आणि “पवित्र रिश्ता. अश्याच अनेक उत्तम मालीकामुळे ती आज एक उत्तम निर्माती आहे.

हेही वाचा

तब्बल 15 वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वेल येणार प्रेक्षकांच्या भेटीला, एकता कपूरने केली घोषणा

 

हे देखील वाचा