Monday, October 12, 2026
Home › बॉलीवूड › तब्बल 15 वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वेल येणार प्रेक्षकांच्या भेटीला, एकता कपूरने केली घोषणा

तब्बल 15 वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वेल येणार प्रेक्षकांच्या भेटीला, एकता कपूरने केली घोषणा

विद्या बालन अभिनीत 2011 सालचा द डर्टी पिक्चर चित्रपट हा त्या वेळी प्रंचड गाजला आणि तसेच त्यातील गाणे देखील प्रेक्षकांना भावले. या चित्रपटात विद्या बालन हिने 1980 च्या दशकातील आयकाॅन सिल्क स्मिताची भुमिका साकारली होती आणि त्यानंतर या चित्रपटामुळे विद्या बालन हिला भरघोस लोकप्रियता मिळाली, या चित्रपटाने विद्या बालनला चित्रपटसृष्टीमध्ये एक अव्वल स्थान मिळवुन दिले. आता द डर्टी पिक्चर 2 या चित्रपटाची घोषणा एकता कपुर केली आहे. आणि तिने म्हणले आहे की, या चित्रपटाची कथा सापडली असुन आता त्यावर काम सुरु आहे. 

एका पाॅडकास्टमध्ये संभाषणादरम्यान एकताने द डर्टी 2 ची घोषणा केली. आणि तिने पुढे सांगितले की, या चित्रपटाचे काम आधीच सुरु झाले आहे. मात्र मुख्य अभिनेत्री कोण असेल आणि कथा कश्या प्रकारची असेल तिने यावेळी उघड केले नाही. एकता कपूर म्हणाली, “मी एका खूप मोठ्या चित्रपटावर काम करत आहे.” “द डर्टी पिक्चर 2,” मी 15 वर्षांनंतर या चित्रपटाची योजना आखत आहे, आणि माझ्या कडची हि कथा सर्वाना नक्कीच आवडेल.

‘द डर्टी पिक्चर 2011 मध्ये आला होता. आणि यात अभिनेत्री विद्या (vidya)बालन हिने प्रमुख भुमिका साकारलाी होती सोबत नसीरुद्दीन शाह, इम्रान होश्मी आणि तुषार कपुर यांसारखे कलाकार होते. हा चित्रपट दाक्षिणात्य अभिनेत्री सिल्क स्मिताच्या जीवनावर आधारीत होता. आणि चित्रपटाला प्रेक्षकांकडुन उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आणि आजही त्यातील गाणे प्रेक्षकांच्या मनात स्थान करुन आहे. तर या चित्रपटाच्या बोलायचे झाल्यास जरी या चित्रपटाच्या येण्याची जरी घोषणा केली असली तरी बरीशी माहिती अजुन गुप्त ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा

भरत आणि पुष्कर न्यायाच्या रणधुमाळीत आमने-सामने; मराठी Zee 5 वर या तारखेला कोण यशवंत पानसरेचा होणार प्रीमियर 

हे देखील वाचा