Tuesday, March 17, 2026
Home बॉलीवूड कंगना रनौतची सहकलाकार नवनींद्र बहल यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन

कंगना रनौतची सहकलाकार नवनींद्र बहल यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन

नवनींद्रा बहल हे एक लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री होत्या, तर यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी इश्कबाज’ आणि ‘क्वीन’ या हिंदी चित्रपटात उत्तम भुमिका केल्या आहेत. तर त्यांच्या निधनाची बातमी त्यांचे पुत्र कानू बहल यांनी सोशल मीडियावर दिली आहे. चित्रपट निर्माते कानू बहल यांनी आपल्या आईच्या आठवणीत एक भावनिक संदेश लिहिला आहे. सोशल मीडियावर नवनींद्रा बहल यांना सर्वजण श्रद्धांजली वाहत आहेत.

नवनींद्रा यांचे लग्न ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते ललित बहल यांच्याशी झाले होते, ज्यांचे 2021 मध्ये दिल्लीत कोविड-19 मुळे निधन झाले. तर कानू बहल यांनी आईचा फोटो शेअर करत लिहिले, “माझी शक्ती. माझा विश्वास. माझे प्रेम. माझी मार्गदर्शक. माझे गुरू. माझे हृदय. अलविदा, आई. त्यांच्या प्रेमाची आठवण काढत त्यांनी पुढे लिहिले, “माझे डोळे नेहमीच ते हास्य, ते गोड हास्य, ती प्रेमळ मिठी आणि ते जिज्ञासू डोळे जे नेहमी चमकत असत, त्यांना शोधत राहतील.

कानू बहल यानी हि पोस्ट शेअर करताच चित्रपट उद्योगातील सदस्यांनी तिच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला. चित्रपट निर्माते अनुराग कश्यप आणि अभिनेते अंशुमन झा, आहाना कुमरा, रसिका दुग्गल आणि हर्षवर्धन कपूर यांनी दिवंगत अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहिली आणि त्यांचे स्मरण केले.

नवनींद्र बहल (bahl)यांचे थिएटर, टेलिव्हिजन आणि चित्रपटांशी खोलवरचे नाते होते. तिने वयाच्या तीन वर्षापासून रंगमंचावर काम करण्यास सुरुवात केली आणि अनेक दशके मनोरंजन उद्योगात सक्रिय होती. तिने गुलजारच्या “माचिस”, दिबाकर बॅनर्जीच्या “ओये लकी! लकी ओये!” आणि कंगना राणौतच्या “क्वीन” यासह अनेक प्रशंसित चित्रपटांमध्ये काम केले होते. सारख्या शोमध्येही दिसली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

द 50; रजत दलालने दिग्विजय राठीला केलं नॉमिनेट,तर दिव्या अग्रवालचा मिळाला सपोर्ट

हे देखील वाचा