धुरंदर हा चित्रपट 2025 मधील सर्वात सुपर हिट ठरलेला चित्रपट आहे. तर याचा दुसरा भाग ही लवकरच प्रदर्शित होतात आहे. तर या चित्रपटाला रिलीज पूर्वेच उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. कारण ॲडव्हान्स बुकिंग मधून प्रचंड कमाई झाली आहे. तर याचे दिग्दर्शक आदित्य धर हे आहे. आदित्य यांनी उरी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. दोन्हीही चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम ठरले. धुरंदर प्रदर्शित झाल्यानंतर आदित्य धार यांचे अनेक लोकांनी कौतुक ही केले होते.
आदित्य धरच्या (Dhar)’धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला 48 तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. तर प्रेक्षकांच्या प्रचंड मागणीमुळे, चित्रपटगृहांनी आता रात्री उशिरा आणि मध्यरात्रीनंतरचे शो सुरू केले आहेत. आत्याच्या घडीला ‘धुरंधर 2’ ची भारतात ॲडव्हान्स बुकिंगद्वारे अंदाजे 15 लाख तिकिटे विकली गेली आहेत. यापैकी निम्मी तिकिटे बुधवारच्या सशुल्क प्रिव्ह्यू शोसाठी विकली गेली आहेत. वाढत्या मागणीला प्रतिसाद म्हणून, मुंबई आणि ठाण्यासारख्या शहरांमधील पीव्हीआर आणि मुव्ही मॅक्स सायनसारख्या चित्रपटगृहांनी आठवड्याच्या शेवटी रात्री 1.50 वाजता शो सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदाबादमधील कॉम्प्लेक्स सिनेमादेखील गुरुवारपासून मध्यरात्रीनंतर शो सुरू करणार आहे.
‘धुरंधर 2’ ची लोकप्रियता यावरून लक्षात येते की, मुंबईच्या प्रतिष्ठित मराठा मंदिर चित्रपटगृहालाही आपली परंपरा बदलावी लागली. शाहरुख खानचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’. जो गेल्या 30 वर्षांपासून सकाळी 11.30 वाजता दाखवला जात होता, आता ‘धुरंधर 2’ च्या वाढीव प्रदर्शनामुळे त्याच्या प्रदर्शनाची वेळ बदलण्यात आली आहे. ‘धुरंधर 2’ ला सामावून घेण्यासाठी ‘डीडीएलजे’ आता सकाळच्या वेळेत हलवण्यात आला आहे, जे चित्रपटाच्या लोकप्रियतेचे स्पष्ट द्योतक आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
द फिफ्टीचा ग्रँड फिनाले कधी रंगणार? 4 फायनल लिस्टची नावे समोर


