मनीष मल्होत्रा हे बॉलिवूड सुपरस्टारचे एक प्रसिद्ध डिझायनर आहेत. ते सध्या त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आहेत आणि सध्या ते एका दुःखद प्रसंगातून जात आहे. मनीष मल्होत्रा यांची आई गरिमा मल्होत्रा यांचे वयाच्या 94 व्या वर्षी झाले निधन झाले आहे. तर आज म्हणजेच शुक्रवारी त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली, त्यावेळेस बॉलिवूडमधील अनेक प्रमुख कलाकारांनी उपस्थित राहून त्यांना अखेरचा निरोप दिला आणि आंदराजली वाहली.
गरिमा मल्होत्रा यांच्यावर शुक्रवारी सांताक्रूझ स्मशानभूमीत हिंदू रितीरिवाजानुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या कठीण काळात डिझायनरला आधार देण्यासाठी चित्रपटसृष्टीतील अनेक सदस्य उपस्थित होते. मनीष यांच्याशी जवळचे नाते असलेले चित्रपट निर्माते करण जोहर स्मशानभूमीत अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. केजेओ यांच्यासोबत उर्मिला मातोंडकर, रकुल प्रीत सिंग, जॅकी भगनानी, डेव्हिड धवन, विजय वर्मा, फातिमा सना शेख यांच्यासह इतरही अनेक जण अखेरचा निरोप देऊन तेथून जाताना दिसले. यापूर्वी, अनेक प्रमुख चित्रपट कलाकारांनी डिझायनरच्या घरी जाऊन शोक व्यक्त केला. तसेच अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन हे देखील त्यांच्या घरी पोहोचले होते.
वरुण (Varun)धवननेही त्याची पत्नी नताशा दलालसोबत मनीषच्या घरी भेट दिली. तसेच करिश्मा कपूर, अर्जुन कपूर, अनन्या पांडे, रविना टंडन आणि झोया अख्तर यांच्यासह इतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही मनीषला त्याच्या मुंबईतील घरी भेट दिली. मनीषची दिवंगत आईना या लोकप्रियता, प्रसिद्धीपासून दूर राहणे पसंत करत होत्या.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
ग्राम चिकित्सालय 2 मध्ये या कलाकाराची एन्ट्री, जो भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील आहे धुरंधर


