Saturday, March 21, 2026
Home बॉलीवूड एस. एस. राजमौली यांनी ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाचे केले कौतुक

एस. एस. राजमौली यांनी ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाचे केले कौतुक

आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा स्पाय ॲक्शन थ्रिलर चित्रपट 19 मार्च 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मात्र हा चित्रपट 18 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये सशुल्क प्रिव्ह्यूसाठी प्रदर्शित झाला. धुरंदर हा चित्रपट 2025 मधील सर्वात सुपर हिट ठरलेला चित्रपट आहे. आणि धुरंदर 2 ने देखील ॲडव्हान्स बुकिंग मधून प्रचंड कमाई केली होती. आणि हा चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे. आदित्य धर दिग्दर्शित हा चित्रपट अनेक कलाकारांना आवडला आहे आणि यावर त्यांनी प्रतिक्रिया ही दिले आहेत.

दिग्दर्शक राजामौली यानीआपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचे कौतुक केले आणि लिहिले की, जरी त्यांना पहिला चित्रपट आवडला असला तरी, हा सिक्वेल मूळ चित्रपटापेक्षा खूपच छान आहे. चित्रपटाचे “लेखन, कलाकार निवड, तांत्रिक गुणवत्ता, संगीत, विश्वनिर्मिती आणि दिग्दर्शन हे सर्व उत्तम आहे.” त्यांनी विशेषतः या भव्य निर्मितीमागील भावनिक पैलूंवर प्रकाश टाकला.

आदित्य धर (Dhar)दिग्दर्शित धुरंधर: द रिव्हेंज हा चार तासांचा चित्रपट प्रदर्शित करण्याच्या धाडसाबद्दल दिग्दर्शक आदित्य धर यांचे कौतुक केले. राजामौली म्हणाले की, चित्रपटाची लांबी असूनही, खऱ्या तणावाला भावनिक वळणांसोबत  गुंफणाऱ्या पटकथेमुळे प्रेक्षक अगदी शेवटच्या दृश्यापर्यंत खिळून राहतात. दिग्दर्शकाने मुख्य कलाकारांची आणि तसेच विशेषतः गुप्तहेर जसकिरत सिंग रंगीची भूमिका पुन्हा साकारणाऱ्या रणवीर सिंगची प्रशंसा केली. राजामौली यांनी सिंगच्या अभिनयाला एक उत्कृष्ट नमुना म्हटले, “रणवीर सिंग, काय अप्रतिम अभिनय आहे, यार.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

लहान चाहतीची इच्छा पूर्ण करताच रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव, क्यूट तक्रारीला दिलं खास गिफ्ट

हे देखील वाचा