सोनम कपूर ही एक बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तर ती सध्या तिच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आहे ते म्हणजे ती दुसऱ्यांदा आई झाली आहे. आणि तिने नुकतेच ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली. ज्यामुळे चाहतांना खूप आनंद झाला आहे. या पोस्टवर चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी अभिनंदन असे कमेंट केले आहे. रविवारी, सोनमने इन्स्टाग्रामवर एक सुंदर चित्रासह ही बातमी शेअर केली आहे.
सोनम कपूर (kapoor)या बातमी शेअर केलेल्या चित्रात निसर्गाच्या सान्निध्यात बसलेली एक स्त्री दिसत आहे, जिच्याभोवती हरीण, पक्षी आणि मोर यांसारखे प्राणी आहेत, तसेच पार्श्वभूमीवर नाजूक फुलांची नक्षी आणि एक स्वप्नवत दृश्य आहे. चित्रासोबतच्या कार्डवर लिहिले होते. आम्ही 29 मार्च 2026 रोजी आमच्या मुलाच्या आगमनाची घोषणा करताना अत्यंत आनंदी आहोत.” पोस्टमध्ये पुढे लिहिले होते, “आमचे कुटुंब वाढले आहे आणि त्याच्या आगमनाने आमची हृदये अत्यंत सुंदरपणे भरून गेली आहेत. वायू त्याच्या लहान भावाचे स्वागत करताना खूप आनंदी आहे.
सोनम कपूरने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. मात्र, ती गेल्या काही काळापासून निवडक प्रकल्पांवर काम करत आहे. सोनमचे वडील अनिल कपूर, हे देखील एक सुपरस्टार बॉलिवूड अभिनेते आहेत. सोनमने 2018 मध्ये उद्योगपती आनंद आहुजा यांच्याशी लग्न केले. लग्नाच्या चार वर्षांनंतर, 2022 मध्ये, सोनमने तिच्या गरोदरपणाची घोषणा केली. 20 ऑगस्ट 2022 रोजी सोनमला पहिला मुलगा झाला. त्यानंतर लगेचच, सोनमने नुकतीच पुन्हा तिच्या गरोदरपणाची घोषणा केली. आता, दुसऱ्या मुलाच्या जन्माने सोनम पुन्हा एकदा आई झाली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
रणवीर सिंग आणि संजय दत्त यांनी पार्टीमध्ये केला डान्स; व्हिडीओ झाला व्हायरल










