Thursday, August 6, 2026
Home टेलिव्हिजन 9.3 रेटिंगच्या या शोने ‘रामायण’लाही टाकला मागे, तर या मालिकेमुळे हिरोचं नशीब बदललं

9.3 रेटिंगच्या या शोने ‘रामायण’लाही टाकला मागे, तर या मालिकेमुळे हिरोचं नशीब बदललं

80 ते 90 च्या दशकात अनेक मालिका होऊन गेल्या त्यातीलच एक म्हणजे रामायण आणि महाभारत या सिरीयलला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. त्यांच्या उत्तम प्रतिसादामुळे आजही त्यातील कलाकार देवतांप्रमाणे प्रेक्षक पूजतात. या सिरीयल मुळे अनेक प्रेक्षक आपली हातातले काम सोडून मालिका पाहत असत. जरी ही मालिका खूप आधी प्रदर्शित झाली असली तरी आज त्याचे एपिसोड्स फोन द्वारे आपण पाहू शकतो आणि याची क्रीज आजही इतकेच आहे. पण ‘रामायण’ व ‘महाभारत’ यांनाही मागे टाकलाले एक कार्यक्रम होता तो म्हणजे ‘देवों के देव…महादेव’. या मालिकेला आयएमडीबीवर उत्तम रेटिंग आहे.

अनेक वर्षांपूर्वी दूरचित्रवाणीवर ‘देवों के देव…महादेव’ ही मालिका लागायची जी २०११ मध्ये सुरु झाली होती आणि लाइफ ओकेवर दाखवली जायची. ट्रायंगल फिल्म कंपनीच्या बॅनरखाली निखिल सिन्हा यांनी दिग्दर्शित केलेल्या या मालिकेने 2014 पर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. सुमारे 820 भागांची ही मालिका तिच्या भव्य बजेट आणि उत्कृष्ट सादरीकरणासाठी ओळखली जात होती. तर या मालिकेने पौराणिक कथा सादर करण्याच्या पद्धतीत क्रांती घडवून आणली.

कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय हा मालिकेच्या प्रचंड यशाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ होता. अभिनेता मोहित रैनाने साकारलेली भगवान शिवाची (shiva)शांत आणि प्रभावी भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. त्याच्या पडद्यावरील उपस्थितीने महादेवाची प्रतिमा प्रत्येक घरात जिवंत केली. लोक आजही म्हणतात की त्याच्यापेक्षा उत्तम शिवाची भूमिका साकारणे अशक्य होते. तर यातील सर्वच कलाकांरानी उत्तम भुमिका साकारल्या होत्या. तर या  मालिकेला IMDb वर 9.3 चे उत्कृष्ट रेटिंग आहे. आज ही, मालिका तुम्ही जिओ हॉटस्टार, एअरटेल एक्सस्ट्रीम आणि टाटा प्ले बिंग पाहु शकता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

२५ एप्रिलला होणार ‘पुढच्या शुक्रवारी ७ वाजता’चा शुभारंभ प्रयोग, सतीश राजवाडे – चैत्राली गुप्ते यांचे रंगभूमीवर दमदार पुनरागमन

हे देखील वाचा