राजपाल यादव लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक उत्तम चित्रपटामध्ये काम केल आहे. तसेच सध्या ते एका कारणामुळे चर्चेत आला होता. ते म्हणजे चेक बाऊन्स प्रकरणामुळे. 2026 च्या सुरुवातीलाच चेक बाऊन्स प्रकरणामुळे राजपाल यादव तिहार तुरुंगात जावे लागले होते. आणि ते काहि दिवसापुर्वी सुटल्यानंतर त्यांनी या संपूर्ण वादावर मौन सोडले आहे. राजपाल यांनी सूचित केले आहे की, या प्रकरणातील सत्य हे लोकांच्या समजापेक्षा खूपच गुंतागुंतीचे आणि सखोल आहे. त्यांनी आपली आर्थिक परिस्थितीबाबत झालेल नुकसान याबाबत त्यांनी त्याचे मत मांडले आहे.
एक पॉडकास्टवरील संभाषणादरम्यान, राजपाल यादव यांनी आपल्या कायदेशीर लढ्याच्या पैलूंवर मनमोकळेपणाने भाष्य केले. एवढी मोठी कारकीर्द आणि अनेक चित्रपट करूनही ते 5 कोटी रुपयांचे छोटे कर्ज का फेडू शकले नाहीत असे विचारल्यावर त्यांनी अत्यंत गंभीरपणे उत्तर दिले. राजपाल म्हणाले, “हाच खरा प्रश्न आहे… ज्या दिवशी लोकांना हे समजेल, त्या दिवशी त्यांना माझे संपूर्ण प्रकरण समजेल. मला पैशांच्या कमतरतेमुळे तुरुंगात पाठवले गेले नाही, त्यांनी दावा केला की, जर हे प्रकरण फक्त 5 कोटी रुपयांचे असते, तर ते 2012 मध्येच मिटले असते. राजपाल यांच्या मते, या वादामुळे त्यांना 17 कोटी ते 22 कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाले. या दरम्यान या 5 कोटी रुपयांमुळे 17 कोटी रुपये बुडाले आहेत.”
2010 मध्ये जेव्हा राजपाल (rajpal)यादवने आपल्या दिग्दर्शकीय पदार्पणासाठी दिल्लीस्थित मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडकडून 5 कोटी रुपयांचे कर्ज घेतले. चित्रपट अयशस्वी ठरल्यानंतर, तो कर्जाची परतफेड करू शकला नाही, 2018 मध्ये, एका दंडाधिकारी न्यायालयाने त्याला चेक बाऊन्स प्रकरणात दोषी ठरवून सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. हळूहळू, व्याज आणि कायदेशीर गुंतागुंतीमुळे ही रक्कम वाढत गेली. तर कामाच्या बाबतीत आता राजपाल यादव भुत बंगला या चित्रपटात दिसले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
8.5 रेटिंगची हि रोमँटिक फिल्म, बालपणीचं प्रेम आणि शाळेच्या आठवणींना देतो उजाळा










