Wednesday, April 22, 2026
Home बॉलीवूड 8.5 रेटिंगची हि रोमँटिक फिल्म, बालपणीचं प्रेम आणि शाळेच्या आठवणींना देतो उजाळा

8.5 रेटिंगची हि रोमँटिक फिल्म, बालपणीचं प्रेम आणि शाळेच्या आठवणींना देतो उजाळा

आज-काल ओटीटी वर मालिका चित्रपट पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. आणि त्यामध्ये ही आणि कॅटेगरी आता उपलब्ध आहे जसे की हॉरर, फॅमिली टाईप, मनोरंजक, सस्पेन्स थ्रिलर असे प्रकार आता उपलब्ध आहेत. त्यातला त्यात हॉरर चित्रपटांचा क्रेझ आजकाल जास्त दिसून येतो. प्रेक्षक घर बसल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून नवनवीन चित्रपट मालिका पाहू शकतात. तर तसेच दाक्षिणात्य चित्रपटांची क्रेझही झपाट्याने वाढलेली दिसत आहे. कारण अनेक उत्तम चित्रपट मालिका दाक्षिणात्य सिनेसृष्टीने दिले आहेत. अशाच उत्तम कंटेन्टचा सिनेमा म्हणजे 96 . हा सिनेमा एक रोमँटिक चित्रपट आहे, ज्याची कथा साधेपणात आहे.

या 96 चित्रपटात विजय (vijay)सेतुपती आणि त्रिशा कृष्णन यांनी भूमिका साकारल्या आहेत. तसेच याला IMDb वर उत्कृष्ट रेटिंग देखील मिळाले आहे. या चित्रपटात विजय सेतुपतीने फोटोग्राफर रामची भुमिका साकारली आहे तर  त्रिशा कृष्णनने जानकी नावाचे पात्र साकारले आहे.

’96’ ची कथा म्हणजे जानकी ही रामची बालपणीची प्रेयसी आहे, आणि ती सिंगापूरहून शाळेच्या पुनर्मिलन समारंभासाठी येत आहे हे कळल्यावर तो भूतकाळात रमून जातो. त्यानंतर राम आणि जानकीचे शालेय दिवस दाखवले जातात. 1996 साली ते वर्गमित्र होते आणि त्यांच्यात प्रेम जुळले.या चित्रपटात विजय सेतुपती, त्रिशा कृष्णन, त्यांच्यासोबत गौरी जी. किशन आणि आदित्य भास्कर आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सी. प्रेम कुमार यांनी केले आहे. 96 ला IMDb वर 8.5 रेटिंग आहे. आणि जर तुम्हाला ते बघायचे असेल तर तुम्ही ते Amazon Prime वर तुम्ही पाहु शकाता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

अभिनेता विजय वर्माच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री? मिस्ट्री गर्लसोबत दिसला अभिनेता

हे देखील वाचा