[rank_math_breadcrumb]

लगान चित्रपटामळे मिळाली खरी ओळख पण हि अभिनेत्री आता कुठे असते घ्या जाणुन

लगान हा एक बॉलीवूड मधील लोकप्रिय चित्रपट आहे. त्यामध्ये आमिर खानने मुख्य भुमिका निभावली आहे त्याने आतापर्यंत अनेक चित्रपट केली. तसेच त्याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. त्याचे अनेक चित्रपट गाजले आहेत. आणि त्यातीलच एक म्हणजे लगान हा चित्रपट. हा चित्रपट म्हणजे एक आदर्श कथा तसेच त्यातील अभिनय सुद्धा उत्तम आहे.  आणि आता नुकतच आमीर खानचा सुपरहिट चित्रपट ‘लगान’ ला 25 वर्षां पुर्ण झाली आहेत. आणि त्यानंतर अनेक यातील अनेक कलाकार यानी अनेक चित्रपट करुन ते आता एक प्रसिध्द कलाकार आहेत मात्र या चित्रपटातील म्हणजेच ‘लगान’मधील ‘गौरी’ या पात्राबद्दल, जी भूमिका अभिनेत्री ग्रेसी (gracy)सिंगने साकारली होती आणि जी आता मोठ्या पडद्यापासून दूर गेली आहे. या अभिनेत्रीने अध्यात्माचा मार्ग स्वीकारला असून, ती आता चित्रपटसृष्टीतील झगमगाटा पासून दूर साधे जीवन जगत आहे.

‘लगान’ नंतर ग्रेसी सिंगने ‘मुन्ना भाई एम.बी.बी.एस.’ सारख्या चित्रपटामध्ये काम मिळाले आणि ते तिने केले तसेच तिने यात डॉक्टरची भूमिका साकारली होती आणि तिची अभिनयाने तिने प्रेक्षकांची मने ही जिकंली.  त्यानंतर तिने काही इतर चित्रपटांमध्ये काम केले असले तरी, तिची कोणतीही भूमिका तितकीशी अविस्मरणीय ठरली नाही. पुढे तिने अध्यात्म आणि टेलिव्हिजनकडे आपला मोर्चा वळवला आणि हळूहळू बॉलीवूडपासून दूर झाली.

आमीर खान (Khan)आणि ग्रेसी सिंग यांची मुख्य भूमिका असलेला ‘लगान’ हा चित्रपट 2001 मध्ये ऑस्करसाठी नामांकित होऊनही, त्यानंतर तिला कामाच्या फारशा संधी मिळाल्या नाहीत. मात्र तिने तिची कामाची सुरुवात एक डान्सने केली होती. आणि नंतर ती चित्रपटाकडे वळाली आता आता ती या क्षेत्रापासुन दुर असुन ग्रेसी सोशल मीडियावर सक्रिय आहे. आणि ती अनेकदा ब्रह्मकुमारी संस्थेशी संबंधित पोस्ट्स शेअर करत असते.

‘370 रुपयांची बिर्याणी’ प्रकरण तापलं, महाराष्ट्रानंतर आता गुरुग्राममध्येही प्रणीत मोरे अडचणीत