धर्मेंद्र बॉलिवूडचे हिमॅन. मागच्या बऱ्याच काळापासून धर्मेंद्र मोठ्या पडद्यापासून लांब त्यांचे वैयक्तिक आयुष्य जगत आहेत. धर्मेंद्र जरी चित्रपटांपासून लांब असले, तरी त्यांच्या फॅन फॉलोविंगमध्ये किंचीतही कमी झालेली नाही. त्यांना सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स फॉलो करतात. सध्या कोरोना काळात धर्मेंद्र त्यांच्या मुंबईतील घरापासून लांब लोणावळ्यातील फार्म हाऊसवर राहत आहेत.
धर्मेंद्र त्यांच्या फार्म हाऊसचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतच असतात. त्यांच्या फार्म हाऊसवर विविध कामात वेळ घालवत असतानाचे त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. कधी ते व्यायाम करत असतात, कधी गाईंना चार घालताना दिसतात, तर कधी भाज्या तोडताना दिसतात. आता सुद्धा धर्मेंद्र यांचा एक अतिशय सुंदर असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
धर्मेंद्र यांच्या पोस्टमधून त्यांच्या फार्म हाऊसची झलक आपल्याला अनेकदा बघायला मिळते. मात्र, आता जो व्हिडिओ धर्मेंद्र यांनी पोस्ट केला आहे त्या व्हिडिओमधून धर्मेंद्र यांच्या घरातून दिसणाऱ्या अतिशय सुरेख अशा निसर्गाचे दर्शन चाहत्यांना घडत आहे.
या व्हिडिओमध्ये मनमोहक निसर्ग आणि शांत सकाळ दिसत असून, सूर्योदय होत आहे. पक्षांचा किलबिलाट, निसर्गरम्य वातावरण, हिरवाई, ढगाळ वातावरण, सूर्योदय झालेला असूनही आकाशात दिसणारा शांत चंद्र आणि सोबतच डोंगरांच्या कुशीतले त्यांचे सुंदर फार्म हाऊस नक्कीच चाहत्यांना भुरळ घालत आहे. परदेशातील पर्यटनाच्या ठिकाणांना देखील मात देणारे त्याचे हे फार्म हाऊस आणि त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या निसर्गाने सर्वांनाच आकर्षित केले आहे.
या व्हिडिओमध्ये धर्मेंद्र देखील दिसत असून, ते त्यांच्या डोक्याला तेलाची मालिश करत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी लिहिले, “सुप्रभात मित्रांनो, मी बदामाच्या तेलाने डोक्याला मालिश करत आहे. हे तेल खूप चांगले असते, मी रोजच अशी मालिश करतो.”
धर्मेंद्र यांचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत असून यावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया देखील येत आहेत. त्यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले, तर ते ‘शिमला मिर्च’ या सिनेमात दिसले होते. सध्या ते त्यांच्या ‘अपने २’ सिनेमाच्या कामात व्यस्त आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…










