कंगना रणौत हि एक लोकप्रिय अभिनेत्री आणि लोकसभा खासदार देखील आहे. ती तिच्या चित्रपटामुळे नाहीतर राजकीय घटानामुळे नेहमीच चर्चेत असते. आणि परत आता एकदा चर्चेत आहे. नुकतेच सीजीपी पक्षाचे आंदोलन संपल्यानंतर आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कंगणा रणौतने तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तिने cjp पार्टिला निशाना करत जंतर मंतर येथील CJP च्या आंदोलनावर उघडपणे टीका केली आहे.
या विद्यार्थी आंदोलनादरम्यान बनवल्या रिल्स आणि वापरल्या जाणाऱ्या भाषेबाबत नाराजी व्यक्त केली आहे, तसेच तीने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तिने पुढे म्हणले आहे की, मी आयुष्यात इतका घाणेरडेपणा आणि कुरुपता पाहिली नाही, आणि हि पोस्ट सध्या सोशल मिडीयावर आता व्हायरल होत आहे.
कंगना (kangna)रणौतने केलेल्या या पोस्ट मधुन असे दिसुन येते की, CJP आंदोलनच्या दरम्यान घडलेल्या काहि घटनाबाबत ती नारज झाली आहे. तसेच तिने पोस्टमध्ये म्हणले आहे की, Gen Z च्या आंदोलनाचे जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ते पाहून मला ओकारी आल्यासारखे वाटते. ज्या प्रकारे ते बोलतात आणि जी भाषा वापरतात, ती अत्यंत किळसवाणी आहे.
तसेच तीने पुढे हे देखील म्हणले कि, भारत हा सर्व प्रकारच्या सुंदर लोकांचा देश आहे. जे लोक सभ्य कपडे घालतात आणि ज्यांना सांस्कृतिक समज आहे. तुम्ही स्वतःला झुरळे म्हणता आणि तरीही त्यांच्यासारखेच दिसता आणि वागता. यात कोणताही विरोधाभास नाही, आणि तुम्ही या घाणीचा बळी बनला आहेत. पण हे पाहुन मला आता सावरण्यासाठी डिजिटल डिटॉक्सची गरज आहे.
‘रामायण’नंतर रणबीर कपूर ‘धूम 4’मध्ये दिसणार? अभिनेत्याने यावर दिले स्पष्ट उत्तर










