Tuesday, January 20, 2026
Home बॉलीवूड ‘डान्स दीवाने’च्या मंचावर शाहरुख खानच्या गाण्यावर थिरकली माधुरी दीक्षित, सोबतच स्पर्धकांनीही दिली साथ

‘डान्स दीवाने’च्या मंचावर शाहरुख खानच्या गाण्यावर थिरकली माधुरी दीक्षित, सोबतच स्पर्धकांनीही दिली साथ

आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य करणारी, बॉलिवूडमध्ये ‘धकधक गर्ल’ या नावाने प्रसिद्ध असणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. ती आता खूप कमी चित्रपटात दिसते. पण या गोष्टीचा परिणाम तिच्या फॅन फॉलोविंगवर अजिबात झालेला दिसत नाही. आजही लाखो लोक तिच्या अदांवर फिदा आहेत. सध्या ती डान्स रिऍलिटी शो ‘डान्स दीवाने 3’ मध्ये परीक्षण करत आहे. या मंचावर ती नेहमीच अनेकांच्या फर्माइशवर डान्स करत असते. यावेळेस देखील असेच काहीसे‌ झाले आहे. तिचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

माधुरी दीक्षित ही 54 वर्षांची आहे, पण तिचा डान्स आणि हवाभाव बघून कोणीही ती वयाचा अंदाज लावू शकत नाही. हा व्हिडिओ कलर्स चॅनेलने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती शाहरुख खानच्या ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटातील ‘बोले चुडियां’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. या मंचावर सगळे परीक्षक आणि स्पर्धक डान्स करताना दिसत आहेत.

कलर्स चॅनलने दोन दिवसा आधी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला 60 हजार पेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. त्यांनी हा व्हिडिओ शेअर करून एक सुंदर कॅप्शन देखील दिले आहे. त्यांनी असे लिहिले आहे की, “या अंदाजाचे तर सर्वच दीवाने आहेत. एका शानदार वीकेंडसाठी तयार आहात का?”

या व्हिडिओमध्ये माधुरीने गुलाबी आणि निळ्या रंगाचा लेहंगा घातला आहे. यामध्ये ती नेहमी प्रमाणेच खूप सुंदर दिसत आहे. तिचा हा डान्स बघून प्रेक्षक हा एपिसोड बघण्यासाठी खूप उत्सुक आहेत. याव्यतिरिक्त तिने ‘कजरा रे’ आणि इतर गाण्यांवरही डान्स केला.

माधुरी दीक्षितने तिच्या करिअरमध्ये बॉलिवूडला एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. यामध्ये ‘दिल’, ‘बेटा’, ‘दिल तो पागल है’, ‘हम आपके है कौन’, ‘साजन’, ‘खलनायक’, ‘देवदास’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. सध्या ‘डान्स दीवाने’ या शोला जज करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा