ज्या देशात स्त्रीची उपासना देवीसारखी केली जाते. त्या देशातील महिलांसोबत बरेच लाजिरवाणे आणि वेदनादायक अपघात घडतात. देशातील समाज हा पूर्वीपासूनच पुरुष वर्चस्व आहे, त्यामुळे बऱ्याच वेळा स्त्रियांना याचा त्रास सहन करावा लागतो. तसे पाहायला गेलो, तर आजच्या युगातील स्त्री सर्व स्तरांवर आघाडीवर आहे. परंतु, आजही कित्येक स्त्रियांना स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव नाहीये. याउलट काही स्त्रिया अशा आहेत, ज्या स्वतःचे सामर्थ्य ओळखून स्वयंपूर्ण बनतात. अशामध्ये अभिनेत्री प्रिया मराठेने शेअर केलेला एक व्हिडिओ चर्चेत आला आहे.
प्रिया मराठेने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिची दोन रूपं पाहायला मिळाली आहेत. तुम्ही यात पाहू शकता की, पहिल्यांदा प्रिया स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करताना दिसत आहे. तर अचानक तिचे दुसरे रूपही पाहायला मिळते. दुसऱ्या रूपात ती हातात तलवार घेऊन, लढाऊ महिलेच्या वेशात दिसली आहे.
हा व्हिडिओ शेअर करत, तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “आणखी एक. मला आशा आहे, तुम्हाला हे आवडेल. स्त्री…ती प्रत्येक रूपामध्ये चमकू शकते!” नेटकरी आता प्रियाच्या या व्हिडिओवर भरभरून प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. याशिवाय तिचे कौतुकही केले जात आहे.
प्रिया सध्या ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत सावित्रीबाई देशमुख म्हणजेच रायबागणची भूमिका साकारताना दिसत आहे. कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर बऱ्याच हिंदी- मराठी मालिकेत काम करून प्रियाने आपली विशेष ओळख बनवली. तिने ‘या सुखांनो या’ या मालिकेद्वारे टीव्हीवर पदर्पण केले. त्यानंतर ती बऱ्याच मालिकेत झळकली. ‘तू तिथे मी’, ‘साथ निभाना साथीया’ अशा मराठी व हिंदी मालिकेत नकारात्मक भूमिका साकारत तिने प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच ‘पवित्र रिश्ता’ या प्रसिद्ध मालिकेत काम करून, प्रिया बरीच लोकप्रिय झाली.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मोटी हो रहीं हूँ क्या मैं?’, कॉफी घ्यायला पोहोचलेल्या राखी सावंतचा व्हिडिओ व्हायरल