‘मोटी हो रहीं हूँ क्या मैं?’, कॉफी घ्यायला पोहोचलेल्या राखी सावंतचा व्हिडिओ व्हायरल

Rakhi Sawant's video viral on social media, says I am look fatty??


‘बिग बॉस’ फेम आणि बॉलिवूडमध्ये ‘ड्रामा क्वीन’ या नावाने प्रसिद्ध असणारी अभिनेत्री म्हणजे राखी सावंत. सध्या लॉकडाऊनमुळे सगळे कलाकार घरातच आहेत. तरीही ते वेगवेगळ्या प्रकारे मनोरंजन करत असतात. पण लॉकडाऊन असतानाही राखी सावंत अनेक वेळा रस्त्यावर स्पॉट झाली आहे. यामुळे ती सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. आता देखील राखी सावंतचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ती कॉफी पिण्यासाठी गेली आहे.

राखी सावंतचा हा व्हायरल व्हिडिओ फिल्मज्ञानने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती गाडीतून खाली उतरते आणि म्हणते की, “माझ्या स्वागतासाठी बघा किती लोकं उपस्थित आहेत.” तिने मल्टी कलरचा ड्रेस घातला आहे. हा ड्रेस जरा तिला टाईट होताना दिसत आहे, तेव्हा तो ड्रेस ओढत ती म्हणते की, “मोटी हो रहीं हूँ क्या मैं?” म्हणजेच “मी काय जाड होत चालली आहे का?.”

काहीजण पाठीमागे ‘हो थोडीशी’, असे म्हणतात. यावर राखी त्यांना ‘चुप रे’, असे म्हणते. इतर काही लोकं म्हणतात की, “नाही अजिबात नाही तू एकदम बरोबर आहेस.” त्यांनतर ती कॉफी प्यायला जाताना दिसते. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तिचे चाहते व्हिडिओवर जोरदार कमेंट करत आहे. लॉकडाऊनच्या काळातही राखी तिच्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

याआधी देखील राखीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये तिची एक छोटी चाहती तिच्याकडे सेल्फी मागते तेव्हा राखी तिला भररस्त्यात डान्स करायला लावते ती देखील तिच्यासोबत ठुमके मारते. हा डान्स झाल्यानंतर ती चाहतीला सेल्फी देते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.