कोरोना काळात नागरिकांना जागरूक करण्यासाठी ‘खिलाडी’ अक्षय कुमारने केला व्हिडिओ शेअर, सांगितल्या ‘या’ ५ टिप्स

Akshay kumar share a 5 tips to taking care in covid 19, video get viral


बॉलिवूडमधील ‘खिलाडी’ अशी ज्याची ओळख आहे तो म्हणजे अक्षय कुमार. अक्षयने नुकताच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमधून अक्षय कुमार नागरिकांना कोरोना काळात कशी काळजी घ्यायची, हे सांगत आहे. अक्षय कुमारने शेअर केलेला हा व्हिडिओ फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स एँड इंडस्ट्रीचा एक हिस्सा आहे.

अक्षय कुमारने आज (५ जून) रोजी त्याच्या चाहत्यांना आणि समस्त जनतेला कोरोना विषयी जागरुक करण्यासाठी आणि त्यांना शिक्षित करण्यासाठी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने पाच टिप्स शेअर केल्या आहेत. ज्यांना कोरोनाची लक्षणे आहेत किंवा जे बरे झाले आहेत. त्यांनी कशी काळजी घ्यायची हे या व्हिडिओमधून दाखवले आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय कुमारसोबत दोन लहान मुले दिसत आहेत.

हा व्हिडिओ शेअर करून अक्षय कुमारने लिहिले आहे की, “कोरोनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स शेअर करत आहे. ज्या या महामारीत लढण्यासाठी तसेच लसीकरण झाल्यानंतरही उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे कृपया लक्ष्य द्या.” अक्षय कुमारने या व्हिडिओचा शेवट “हर घर ने थाना है, कोरोना को हराना है,” या पंक्तीनी केला आहे.

फिक्कीने लोकांना कोरोनाबाबत शिक्षित करण्यासाठी एक अभियान सुरू केले आहे. या अभियानाचे नाव ‘कोरोना को हराना है’ हे आहे. हे अभियान खूप व्यापक आहे. वेगवेगळ्या भाषांमध्ये हे अभियान सुरू केले आहे. यामध्ये कलाकार सामील आहेत. हिंदी, मराठी आणि पंजाबीमध्ये अक्षय कुमार, तमिळमध्ये आर्य, तेलुगुमध्ये चिरंजीवी आणि कन्नडमध्ये पुनित राजकुमार करत आहेत.

अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना हे दोघेही मागील काही दिवसांपासून कोरोना काळात त्यांचे योगदान देत आहेत. दान आणि कोव्हिड सहायता कॉल या व्यतिरिक्त ते दोघे जनतेला कोरोना बाबतीत शिक्षित करत आहेत.

त्याच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो लवकरच ‘अतरंगी रे’, ‘रामसेतू’, ‘रक्षाबंधन’, ‘पृथ्वीराज’ आणि ‘बेल बॉटम’ या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.