Saturday, October 18, 2025
Home बॉलीवूड खूपच गोड! रश्मिकाचे हृदय जिंकले फक्त ०. ३ मिलिसेकंदात; पाहा कोण आहे इतके नशीबवान?

खूपच गोड! रश्मिकाचे हृदय जिंकले फक्त ०. ३ मिलिसेकंदात; पाहा कोण आहे इतके नशीबवान?

मागील एका वर्षापासून कोरोना व्हायरसने जगभरात भयंकर रूप धारण केले आहे. भारतातही कोरोनाने आपले पाय पसरले आहेत. त्यामुळे लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवली. सर्वसामान्य व्यक्तींपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांनाच घरात बसावे लागले. मात्र, शांत बसतील ते कलाकार कसले? जवळपास सर्वच कलाकारांचा  यादरम्यान सोशल मीडियावरील वावर वाढला आहे. आपल्या चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ते घरात आणि सुरक्षित राहण्याचे आवाहनही करत आहेत. यामध्ये ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदानाचाही समावेश आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर आपला थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती एन्जॉय करताना दिसत आहे. या फोटोंमध्ये ती आपल्या कुत्र्यासोबत दिसत आहे.

फोटो शेअर करत तिने लिहिले की, “तुम्ही ३ सेकंदात कोणाच्याही प्रेमात पडू शकता, परंतु मला वाटते की, तिने माझे हृदय ०.३ मिलिसेकंदात जिंकले. तसंही तुम्हाला माहिती द्यायची होती.”

तिच्या या फोटोला सोशल मीडियावर चाहत्यांकडून खूप पसंती मिळत आहे. यासोबतच लाईक्स आणि रिट्विटचा अक्षरश: पाऊस पडत आहे. नुकतेच तिने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर आपल्या लहानपणीचा फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे. या फोटोत ती लाल रंगाच्या टी-शर्टमध्ये पोझ देताना दिसत आहे. रश्मिकाच्या या फोटोला सोशल मीडियावर चाहत्यांकडून खूप पसंती मिळाली होती.

तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती लवकरच ‘मिशन मजनू’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राही दिसणार आहे. चित्रपटाची कहाणी ७० च्या दशकातील भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्वात मोठ्या मिशनच्या घटनेवर आधारित आहे.

शंतनू बागची दिग्दर्शित या चित्रपटातून रश्मिका बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. चित्रपटात रश्मिका आणि सिद्धार्थ यांच्याव्यतिरिक्त शारिब हाशमी, कुमुद मिश्रा हेदेखील दिसणार आहेत. याव्यतिरिक्त रश्मिका अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता अभिनित ‘गुड बाय’ चित्रपटातही झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा