‘बोले चुडिया’ गाण्यावर धमाल डान्स करत, किशोरी शहाणे यांनी वेधले नेटकऱ्यांचे लक्ष! व्हिडिओ होतोय व्हायरल

marathi actress kishori shahane dances on bole chudiya song video goes viral on internet


मराठमोळ्या अभिनेत्री किशोरी शहाणे यांची चित्रपट कारकीर्द दीर्घ राहिली आहे. अभिनयाद्वारे त्यांच्या वेगवेगळ्या छटा प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या आहेत. मोठा पडदा गाजवल्यानंतर किशोरी ‘बिग बॉस मराठी’ या रियॅलिटी शोमध्ये दिसल्या होत्या. यानंतर त्या आता छोट्या पडद्यावरील ‘गुम है किसी के प्यार’ या हिंदी मालिकेतून दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. याशिवाय किशोरी सोशल मीडियावर सक्रिय राहून, त्यांचे फोटो व व्हिडिओ शेअर करत असतात.

नुकताच किशोरी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्या नाचताना दिसत आहेत. यामध्ये डान्स करताना त्यांना अभिनेत्री स्नेहा भावसारनेही साथ दिली आहे. ‘बोले चुडिया’ गाण्यावर या दोघींचा डान्स पाहून, चाहतेही चक्रावले आहेत. ‘गुम है किसी के प्यार’ मालिकेतील या दोघींची ऑनस्क्रीन केमिस्ट्री तर जबरदस्त आहेच, मात्र त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री देखील चाहत्यांना पसंत पडली आहे.

किशोरी यांनी हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “भवानी काकू आणि करिश्मा ऑनस्क्रीन ऑफ बीट पण म्युझिक ऑन बीट्स…परफेक्ट ट्यूनिंग.” या व्हिडिओवर आता त्यांच्या चाहत्यांच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. आतापर्यंत या व्हिडिओला ९ हजाराहून अधिक युजर्सने पाहिले आहे.

किशोरी यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्यांनी बऱ्याच हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या समवेत भूमिका असलेल्या ‘प्रेम करूया खुल्लम खुल्ला’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते. याशिवाय किशोरी चित्रपट निर्मात्या देखील आहेत. २०१९ साली कलर्स मराठी चॅनलवरील ‘बिग बॉस’ मराठी रियॅलिटी शोमधील सहभागामुळे त्या पुन्हा प्रकाशझोतात आल्या होत्या.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.