Monday, February 24, 2025
Home मराठी ‘…सर्वकाही डोळ्यात असतं!’, म्हणत मराठमोळ्या अमृता खानविलकरचं ब्लॅक ऍंड व्हाईट फोटोशूट आलं चर्चेत

‘…सर्वकाही डोळ्यात असतं!’, म्हणत मराठमोळ्या अमृता खानविलकरचं ब्लॅक ऍंड व्हाईट फोटोशूट आलं चर्चेत

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिंदी आणि मराठी अशा दोन्ही चित्रपटसृष्टीमध्ये प्रसिद्ध नाव बनली आहे. आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित करणारी अभिनेत्री तिच्या फिटनेस आणि फॅशन स्टेटमेंटसाठी बरीच चर्चेत असते. आता अभिनेत्री तिच्या सुंदरतेसाठी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने शेअर केले काही फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

अमृताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटकरून एकूण तीन फोटो पोस्ट केले आहेत. हे तीनही फोटो ब्लॅक ऍंड व्हाईट आहेत, ज्यात अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. एकदम साधा मेकअप आणि कानात घातलेले जड दागिने तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहेत. यात हॉट असा लेहंगा परिधान करून अमृता फोटोसाठी पोझ देत आहे.

या ब्लॅक ऍंड व्हाईट फोटोमधील अमृताच्या अदा अगदी पाहण्यासारख्या आहेत. हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “ते म्हणतात की, सर्वकाही डोळ्यात असतं.” अभिनेत्रीचे हे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत. म्हणूनच बघता बघता फोटोवर लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊस पडलेला पाहायला मिळतोय. एका दिवसात या फोटोवर ५८ हजाराहून अधिक युजर्सने लाईक केले आहे.

अमृताच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती येत्या काळात सचिन कुंडलकरच्या ‘पॉंडिचेरी’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत वैभव तत्ववादी, महेश मांजरेकर आणि सई ताम्हणकर हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत पाहायला मिळतील. तसेच अभिनेत्रीने ‘राझी’ आणि ‘सत्यमेव जयते’ या हिंदी चित्रपटांतून बॉलिवूडमध्येही खास ओळख निर्माण केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘पावसाळ्या संध्याकाळी होणारे काही मूड…’, म्हणत भजी खाण्यापूर्वी शेतात फिरताना दिसतोय सुव्रत जोशी

-जेव्हा कृष्णा अभिषेकने घेतले होते अनिल कपूरचे रूप; पाहून लोटपोट झाली होती सोनम कपूर

-‘तूच माझ्या जगण्याचा आधार’, सपना चौधरीच्या सुंदर व्हिडिओवर चाहत्याची प्रेमळ कमेंट

हे देखील वाचा