‘पावसाळ्या संध्याकाळी होणारे काही मूड…’, म्हणत भजी खाण्यापूर्वी शेतात फिरताना दिसतोय सुव्रत जोशी


संजय जाधव दिग्दर्शित ‘दिल दोस्ती दुनियादारी’ चांगलीच गाजली. मालिकेसोबतच यातील कलाकारांना देखील बरीच प्रसिद्धी मिळाली. स्वभावाने कडक आणि शिस्तप्रिय असणारा, मात्र मित्रांच्या मदतीला धावून जाणारा सुज्या अर्थातच अभिनेता सुव्रत जोशीची भूमिका अजूनही चाहत्यांना चांगलीच लक्षात आहे. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणारा अभिनेता आता चर्चेत आला आहे.

आता सुव्रत जोशी गावाकडे आपला वेळ घालवत आहे. तिथून त्याच्या शेतातील फोटो आणि व्हिडिओ शेअर करून, तो नेटकऱ्यांचे लक्ष वेधताना दिसत आहे. आता पावसाळ्याचा ऋतू चालू आहे आणि सर्वांनाच हा ऋतू प्रिय आहे. अभिनेताही गावाकडे या ऋतूचा मनसोक्त आनंद घेताना दिसतोय.

नुकताच त्याने पुन्हा कोकणातून त्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सुव्रत शेताच्या मध्ये उभा आहे, तर त्याच्या आजूबाजूला हिरवंगार शेत दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत अभिनेता पावसाळ्यातील त्याचे वेगवेगळे मूडही सांगतोय.

शेतातला हा व्हिडिओ शेअर करत सुव्रतने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “पावसाळ्या संध्याकाळी होणारे काही मूड. दुपारची झोप झाल्यावर आणि गरम भाजी खाण्याआधी.” या व्हिडिओवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरून सहज लक्षात येईल की, सुव्रत निसर्गाच्या सानिध्यात कशाप्रकारे एन्जॉय करत आहे.

सुव्रत हा प्रसिद्ध लेखक शेखर जोशी यांचा मुलगा आहे. त्याने एप्रिल २०२९ मध्ये त्याची सहकलाकार सखी गोखलेसोबत लग्नगाठ बांधली. त्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तो ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘दिल दोस्ती दोबारा’ आणि ‘आठशे खिडक्या आणि नऊशे दारे’ या मालिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तूच माझ्या जगण्याचा आधार’, सपना चौधरीच्या सुंदर व्हिडिओवर चाहत्याची प्रेमळ कमेंट

-‘पुन्हा शेपमध्ये येणं खरंच अवघड आहे का?’ नुकतंच मातृत्व अनुभवलेल्या धनश्री काडगावकरने स्त्रियांना केलं मोलाचं मार्गदर्शन

-या चिमुकलीला ओळखलं का? आज तिच्या ‘कॉमिक टायमिंग’साठी आहे प्रसिद्ध; तर प्रेक्षकांना पोट धरून हसायला पाडते भाग


Leave A Reply

Your email address will not be published.