ऍमेझॉन प्राईम सीरिज ‘द फॅमिली मॅन 2’ ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. राज आणि डीके यांच्या या सीरिजने अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. यामधील प्रत्येक पात्राने त्यांच्या अभिनयाने सगळ्यांना मंत्रमुग्ध केले आहे. मनोज वाजपेयी, श्रेया धन्वंतरी, समंथा अक्किनेनी, प्रियामणि आणि आश्लेषा सोबत अनेक कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने सर्वांचे मनोरंजन केले आहे. या सीरिजमुळे अनेक वाद उभे राहिले आहेत. तरीही प्रेक्षक या सीरिजला खूप प्रेम देत आहेत. यातच समंथाचा हैराण करणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ शूटिंग दरम्यानचा आहे, जेव्हा ती स्टंट करत होती.
समंथा अक्किनेनीचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ शूटिंग दरम्यानचा आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, समंथा कोणत्याही स्टंटमॅन शिवाय काही सीन्स करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ अभिनेते शारीब हाश्मी यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
शारीब हाश्मी यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, समंथा केवळ हार्नेसच्या साहाय्याने गच्चीवर चढते. त्या दरम्यान तिच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली होती. या सीरिजमध्ये हा सीन मनोज वाजपेयी म्हणजेच श्रीकांत तिवारी यांनी केला होता. ज्याचा हा बिहाईंड द सीन व्हिडिओ आहे.
https://www.instagram.com/p/CQIb9y_Jj84/?utm_source=ig_web_copy_link
हा व्हिडिओ शेअर करून अभिनेता शारीब हाश्मी यांनी लिहिले आहे की, “समंथा अक्किनेनीला तिचे स्वतःचे स्टंट करताना पाहून हैराण झालो होतो. तुला माझा सलाम आहे समंथा.”
हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तिचे चाहते देखील हा व्हिडिओ पाहून हैराण होत आहेत. तसेच तिचे चाहते तिच्या या स्टंटचे कौतुक करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–भन्नाटच! कियारा आडवाणी बनलीय ‘स्टंट गर्ल’, एकाच किकमध्ये उडवली समोरच्या व्यक्तीच्या डोक्यावरील टोपी
-कॅन्सर पीडित व्यक्तीने भावुक होऊन धरले थेट सोनू सूदचे पाय, अभिनेत्याने दिली ‘अशी’ रिऍक्शन