भन्नाटच! कियारा आडवाणी बनलीय ‘स्टंट गर्ल’, एकाच किकमध्ये उडवली समोरच्या व्यक्तीच्या डोक्यावरील टोपी


बॉलिवूडमध्ये अनेक प्रतिभावान अभिनेत्री आहेत. त्यातील काहींनी जेमतेम वीसेक सिनेमांत काम केले असेल. मात्र, यातील त्यांनी साकारलेल्या भूमिकांनी त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले. अगदी कमी काळात त्यांनी मिळवलेले हे यश वाखाणण्याजोगे आहे. या अभिनेत्रींच्या यादीत आवर्जुन नाव घ्यावे ते म्हणजे कियारा आडवाणी हिचे. कियाराने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने लाखो चाहत्यांच्या मनात मानाचे स्थान निर्माण केले आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर सक्रिय असणारी कियारा आता स्टंट गर्लही बनली आहे. तिने नुकताच आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती जबरदस्त स्टंट करताना दिसत आहे.

विशेष म्हणजे हा स्टंट करण्यासाठी ती मागील दीड वर्षांपासून मेहनत घेत आहे. हे आम्ही सांगत नाही, तर खुद्द कियाराने सांगितले आहे.

‘माझ्या किक्सवर विश्वास ठेवण्यासाठी धन्यवाद’
कियारा नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत असते. अशातच तिने शेअर केलेला स्टंट व्हिडिओ चाहत्यांच्याही पसंतीत पडत आहे. या व्हिडिओत तिने स्टंट करत एकाच किकमध्ये एका व्यक्तीच्या डोक्यावरील टोपी उडवली आहे. हा व्हिडिओ शेअर करत कियाराने आपल्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “दीड वर्षांनंतर माझ्या किक्सवर विश्वास ठेवण्यासाठी सलाम ललित गुरुंग.” कियाराच्या या व्हिडिओला आतापर्यंत ३० लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज आणि ६ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

बिकिनी घालून अंडरवॉटर स्विमिंग करताना दिसली होती कियारा
स्टंट व्हिडिओपूर्वी कियाराने आपले अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यातील जवळपास सर्वच व्हिडिओंना चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. यातील तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये ती अंडरवॉटर स्विमिंग करताना दिसली होती.

‘या’ चित्रपटांत दिसणार कियारा
कियाराच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर कियारा ‘शेरशाह’ चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. याव्यतिरिक्त ती ‘भूल भुलैया २’मध्ये कार्तिक आर्यनसोबत आणि ‘जुग जुग जियो’मध्ये वरुण धवनसोबत दिसणार आहे. यासोबतच असे वृत्त आहे की, कियारा रणवीर सिंगसोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, या चित्रपटाची निर्मिती एस शंकर करत आहेत आणि सुपरहिट चित्रपट ‘अन्नियन’चा हिंदी रिमेक असेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘इंडियन आयडल’मधील स्पर्धकाचे गाणे ऐकून अनु मलिक यांनी स्वत:लाच मारली होती थोबाडीत; जुना व्हिडिओ व्हायरल

-देशद्रोहाच्या गुन्ह्यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ; पासपोर्ट रिन्यू करण्यासाठी अभिनेत्रीची कोर्टात धाव

-‘हे मॉं, माताजी!,’ दयाबेनचा बोल्ड अवतार पाहून चाहते झाले हैराण; बॅकलेस ब्लाऊजमध्ये केला धमाकेदार डान्स


Leave A Reply

Your email address will not be published.