‘इंडियन आयडल’मधील स्पर्धकाचे गाणे ऐकून अनु मलिक यांनी स्वत:लाच मारली होती थोबाडीत; जुना व्हिडिओ व्हायरल


टेलिव्हिजन क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध असणारा सिंगिंग रियॅलिटी शो ‘इंडियन आयडल’ मागच्या काही दिवसांपासून सतत वादात अडकत आहे. स्पर्धकांना बाहेर काढण्यावरून, काही स्पर्धकांच्या एलिमनेशनमुळे किंवा स्पर्धकांच्या खोट्या स्तुतीमुळे हा शो सतत चर्चेत येत आहे. या वादांचा परिणाम शोच्या टीआरपीवर देखील झाला असून, शो टीआरपीच्या टॉप ५ मधून बाहेर आला आहे.

आता या शो संबंधित एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. ही व्हिडिओ क्लिप ‘इंडियन आयडल’च्या ११ व्या पर्वाच्या ऑडिशन फेरीतील क्लिप आहे. यात पवन कुमार नावाचा एक स्पर्धक गाणे गाण्यासाठी आला. त्याचे बेसुरेल आणि कर्णकर्कश गाणे ऐकून परीक्षक असलेले विशाल दादलानी, नेहा कक्कर आणि अनु मलिक यांनी डोके झोडून घेतले आहे.

पवन कुमारने ‘ए दिल है मुश्किल’ चित्रपटातील ‘बुल्लेया’ हे गाणे म्हटले. त्याचे हे गाणे ऐकून विशालने डोक्याला हात मारला, नेहा जोरात ओरडत रडायला लागली, तर अनु मलिकने स्वतःच्याच थोबाडीत मारून घेतली. त्याचे गाणे ऐकून या तिघांनी दिलेली रिऍक्शन अतिशय मजेशीर होती.

पवन कुमारने ऑडिशन रूममध्ये येताना कोमट पाण्याचा ग्लास सोबत आणला होता. गाणे गाण्याआधी त्याने ते कोमट पाणी प्यायले आणि गाण्याला सुरुवात केली. त्याची सुरूवात झाल्यानंतर सगळीकडे एकच कल्ला झाला. अतिशय आत्मविश्वासाने बेसुऱ्या आवाजात गाणाऱ्या पवन कुमारला पाहून अनु मलिकने खरोखर स्वतःला चापट मारून घेतले होते. सेट इंडियाने देखील याचा एक व्हिडिओ यूट्यूबवर पोस्ट केला आहे.

‘इंडियन आयडल’च्या १० व्या पर्वात अनु मलिक परीक्षक असताना गायिका सोना महापात्रा, नेहा भसीन, श्वेता पंडितसोबत अनेक महिलांनी त्यांच्यावर यौनशोषणाचे आरोप लावले होते. त्यामुळे त्यांना या शोमधून काढून टाकण्यात आले होते.

तत्पूर्वी ‘इंडियन आयडल’च्या सुरू असलेल्या १२ व्या पर्वाच्या शोवर होणाऱ्या अनेक आरोपांमुळे गाजत आहे. अंजली गायकवाडला शोमध्ये परत घेण्याच्या मागणीसोबतच शनमुखप्रियाला आणि दानिशला शोमधून काढण्याची मागणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-देशद्रोहाच्या गुन्ह्यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ; पासपोर्ट रिन्यू करण्यासाठी अभिनेत्रीची कोर्टात धाव

-‘हे मॉं, माताजी!,’ दयाबेनचा बोल्ड अवतार पाहून चाहते झाले हैराण; बॅकलेस ब्लाऊजमध्ये केला धमाकेदार डान्स

-व्वा! अभिनेत्री वनिता खरातने घेतली पहिली कार, फोटो शेअर करून लिहिले ‘स्वप्नपूर्ती’


Leave A Reply

Your email address will not be published.