Wednesday, April 23, 2025
Home वेबसिरीज ‘द फॅमिली मॅन २’च्या यशानंतर निर्मात्यांकडून तिसऱ्या सिझनची तयारी सुरू, खलनायकाबाबत घेतला मोठा निर्णय

‘द फॅमिली मॅन २’च्या यशानंतर निर्मात्यांकडून तिसऱ्या सिझनची तयारी सुरू, खलनायकाबाबत घेतला मोठा निर्णय

नुकतेच काही दिवसांपूर्वी मनोज वाजपेयी यांची ‘द फॅमिली मॅन 2’ ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. प्रेक्षकांना देखील ही वेब सीरिज खूप आवडली आहे. या दुसऱ्या सिझनची क्रेझ कमी होत नाही, तेवढ्यात या वेब सीरिजच्या निर्मात्यांनी तिसऱ्या सिझनची तयारी चालू केली आहे. अशातच अशी माहिती समोर आली आहे की, या सीरिजच्या तिसऱ्या सिझनमध्ये साऊथ सुपरस्टार विजय सेतूपती याची एन्ट्री होणार आहे. (The family man 2 web series makers start to plan about third season of series)

माध्यमातील वृत्तानुसार, ‘द फॅमिली मॅन’चा तिसरा सिझन आणखीनच मनोरंजक आणि धमाकेदार असणार आहे. या वेब सीरिजचे निर्माते आणि दिग्दर्शकांनी मिळून यामधील खलनायकाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. अशी माहिती येत आहे की, या पात्रासाठी तमिळ सुपरस्टार विजय सेतूपतीला अप्रोच केले आहे. राज आणि डीके यावेळेस ‘द फॅमिली मॅन 3’ साठी विजयला साईन केले आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, ‘द फॅमिली मॅन 2’ साठी विजयला अप्रोच केले होते. परंतु ते व्यस्त असल्याकारणाने त्याने हा चित्रपट करण्यास नकार दिला. परंतु आता पुढच्या सिझनसाठी विजयने होकार दर्शवला आहे की नाही, ही बातमी अजून समोर आली नाही. याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. आशा आहे की, या सीरिजचे निर्माते आणि दिग्दर्शक लवकरच याची अधिकृत घोषणा करतील.

‘द फॅमिली मॅन 3’ संदर्भात दिग्दर्शक आणि निर्माते राज आणि डीके यांनी असे सांगितले होते की, “आम्ही या वेळेस थोडे मागे आहोत. आमच्याकडे एक नवीन दुनिया तयार आहे. आमच्याकडे कन्सेप्ट आहे, विचार आहे. परंतु अजूनही आम्ही ही कहाणी तयार करत आहोत. आम्ही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या आहेत, त्या शानदार आहेत. आम्हाला आता पुन्हा एकदा एकत्र येऊन, विचार करून लिखाण करण्याची गरज आहे. आम्ही परिणामांचा विचार न करता काम करत आहोत.”

‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजच्या दोन्ही सिझनला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बंगाली ब्युटी’ मौनी रॉयने केले बेडरूममधील फोटो शेअर; कातिलाना अंदाजाने चाहते घायाळ

-‘पितृदिना’निमित्त अभिनेता आयुषमान खुरानाची भावुक पोस्ट; आपल्या नावाशी संबंधित सिक्रेटचाही केला खुलासा

-‘बापमाणूस!’, ‘पितृदिना’निमित्त सिद्धूची खास पोस्ट आली समोर; होतोय प्रेमाचा वर्षाव

हे देखील वाचा