‘पितृदिना’निमित्त अभिनेता आयुषमान खुरानाची भावुक पोस्ट; आपल्या नावाशी संबंधित सिक्रेटचाही केला खुलासा


आपल्या वडिलांचा त्याग, समर्पण आणि बलिदान या सगळ्याची आठवण काढत त्यांचा आदर करत जगभरात दरवर्षी जून महिन्याचा तिसरा रविवार हा ‘पितृदिन’ म्हणून साजरा केला जातो. आज रविवारी (20 जून) हा खास दिवस साजरा केला जात आहे. वडील हे आपल्या आयुष्यातील अशी एक व्यक्ती असते की, ज्यांचं आपलं आयुष्यात फक्त असणंच पुरेसं असतं. ते आपल्या कातड्यांचे जोडे करून आपल्या मुलांच्या पायात घालायला देखील मागे पुढे बघत नाहीत. हा दिवस प्रत्येक वडिलांसाठी आणि मुलांसाठी खूप खास असतो. यानिमित्त अनेक बॉलिवूड कलाकार त्यांच्या वडिलांसोबतचा फोटो शेअर करत आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना याने देखील त्याच्या वडिलांसोबत काही फोटो शेअर केले आहेत. (Ayushmann Khurrana’s emotional post on social media about father’s day)

आयुषमान खुरानाने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या वडिलांसोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्याचे वडील हार्मोनियम वाजवताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करून त्याने एक भावुक पोस्ट देखील लिहिली आहे. त्याने लिहिले आहे की, “लहानपणी वडिलांनी लावलेले निर्बंध तोडायला मला खूप आवडत होते. आता मोठे झाल्यावर स्वतःवर लावलेले निर्बंध तोडता येत नाहीत. हे आम्हाला त्यांच्यामुळेच मिळाले आहे.” यासोबतच आयुषमानने त्याच्या नावातील दोन एन आणि दोन आरचा‌ अर्थ सांगितला आहे.

त्याने पुढे लिहिले की, “अनुशासन, संगीत, कविता आणि कला प्रेमी. ज्यांनी कायद्याचा अभ्यास केला आहे परंतु नेहमीच ज्योतिषामध्ये रस घेतला आहे. हे एक मात्र कारण आहे की, माझ्या नावात दोन वेळा एन आणि दोन वेळा आर आहेत. यासोबतच त्यांनी शिकवले आहे की, आमच्याकडे आमचे भविष्य घडवण्याची क्षमता आहे. आपले कर्म आपल्या भविष्यातील आपले स्थान ठरवतात. माझे मित्र, दिशादर्शक आणि मार्गदर्शक माझे वडील.” आयुषमान खुरानाची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

आयुषमान खुरानाचे वडील एक प्रसिद्ध जोतिष आहेत. आयुषमानने केलेल्या या पोस्टवर त्याचा भाऊ अपारशक्ती आणि पत्नी ताहिराने प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांनी त्यांच्या या पोस्टवर हार्ट ईमोजी पोस्ट केली आहे. संगीत दिग्दर्शक अनु मलिक यांनी या फोटोवर कमेंट केली आहे की, “तुला आणि तुझ्या वडिलांना पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”

आयुषमान खुरानाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो ‘नजर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनव सिन्हा करत आहेत. यासोबतच तो ‘चंदीगड करे आशिकी’मध्ये देखील दिसणार आहे. तसेच तो रकुल प्रीत सिंगसोबत ‘डॉक्टर जी’ या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘कमिंग सून’ म्हणत श्रुती मराठेने शेअर केला ग्लॅमरस व्हिडिओ; चाहत्यांना प्रतीक्षा नव्या फोटोशूटची

-जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने गायिका सावनी रविंद्र प्रेक्षकांसाठी घेऊन आली खास मल्याळम गाणं

-‘फादर्स डे’च्या निमित्ताने जॅस्मिन भसीनने आई वडिलांसाठी प्लॅन केले खास गिफ्ट; लवकरच देणार ‘हे’ सरप्राईज


Leave A Reply

Your email address will not be published.