‘बंगाली ब्युटी’ मौनी रॉयने केले बेडरूममधील फोटो शेअर; कातिलाना अंदाजाने चाहते घायाळ


चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात टेलिव्हिजनपासून केली, आणि नंतर चित्रपटांमध्ये प्रवेश केला. शाहरुख खानपासून ते अगदी आताच्या सुशांत सिंग राजपूत, मोहित रैनापर्यंत बरेच असे कलाकार आहे ज्यांनी टेलिव्हिजनमध्ये आपल्या अभिनयाची जादू पसरवल्यानंतर चित्रपटांमध्ये देखील अभिनयाची भुरळ प्रेक्षकांवर घातली.

याच यादीतले एक मोठे नाव म्हणजे मौनी राय. ‘बंगाली ब्युटी’ म्हणून ओळखली जाणारी मौनी खूप कमी काळात चित्रपटांमध्ये स्थिरावली आहे. मौनीने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रचंड लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. मौनी फक्त मालिका, चित्रपट यामध्येच नाही, तर सोशल मीडियावरही तुफान लोकप्रिय आहे. तिला इंस्टाग्रामवर जवळपास १७ मिलियन फॉलोवर्स आहेत.

सोशल मीडिया सेन्सेशन असणारी मौनी याच माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. शिवाय ती तिचे विविध फोटो, व्हिडिओ देखील अनेकदा पोस्ट करत असते. सध्या मौनी चर्चेत येण्यामागचे मुख्य कारण म्हणजे मौनीने इंस्टाग्रामवर शेअर केलेले तिचे लेटेस्ट फोटो.

ब्लॅक एँड व्हाईट बॅकलेस ड्रेसमधले मौनीचे बेडरूममधील फोटो सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. तिच्या या बेडरूम फोटोमध्ये मौनीचा कातिलाना अंदाज सर्वच चाहत्यांना घायाळ करत आहे. बेडवर असलेल्या पुस्तकासमोर मौनीच्या हॉट अदा तिच्या फोटोला चार चाँद लावत आहे.

हे फोटो शेअर करताना तिने लिहिले, “माझ्या पोर्टेबल जादूशिवाय काहीच नाही.” सध्या मौनीचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, कलाकारांसोबतच, फॅन्सदेखील तिच्या या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्स करताना दिसत आहे. मौनीची असे मादक फोटो शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. ती नेमहीच तिचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसते.

मौनीबद्दल सांगायचे झाले, तर काही दिवसांपूर्वी तिच्या लग्नाच्या बातम्या माध्यमांमध्ये रंगल्या होत्या. मौनीने २००६ मध्ये ‘क्योंकि सांस कभी कभी बहू थी’ मालिकेतून अभिनयात प्रवेश केला. त्यानंतर ती अनेक मालिकांमध्ये दिसली. मात्र, तिच्या करिअरला वळण देण्याऱ्या ‘देवो के देव महादेव’ आणि ‘नागिन’ या दोन मालिका महत्त्वाच्या ठरल्या. २०१६ साली मौनीने अक्षय कुमारसोबत ‘गोल्ड’ सिनेमातून पदार्पण केले. आता मौनी आलिया, रणबीर, अमिताभ बच्चन यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘पितृदिना’निमित्त अभिनेता आयुषमान खुरानाची भावुक पोस्ट; आपल्या नावाशी संबंधित सिक्रेटचाही केला खुलासा

-‘बापमाणूस!’, ‘पितृदिना’निमित्त सिद्धूची खास पोस्ट आली समोर; होतोय प्रेमाचा वर्षाव

-‘फादर्स डे’च्या निमित्ताने जॅस्मिन भसीनने आई वडिलांसाठी प्लॅन केले खास गिफ्ट; लवकरच देणार ‘हे’ सरप्राईज


Leave A Reply

Your email address will not be published.