रविवारी (२० जून) ‘पितृदिना’निमित्त सर्वजण आपल्या वडिलांसोबतचे फोटो शेअर करून त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करत आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी या खास दिवशी एक वेगळीच पोस्ट केली आहे. त्यांनी आज एक वडील म्हणून त्यांची काय जबाबदारी आहे, हे सांगणारी पोस्ट केली आहे.
जॅकी श्रॉफ हे बॉलिवूड मधील एक नावाजलेले अभिनेते आहेत. त्यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यांच्या लूक्सचे आणि अभिनयाचे सगळे दीवाने आहेत. त्यांनी बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटात वडिलांचे पात्र निभावले आहे. परंतु वैयक्तिक आयुष्यात ते स्वतःला एक पिता म्हणून कमी लेखतात. याची माहिती त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये दिली आहे. (Jackie Shroff’s emotional post on father’s day about his son’s)
जॅकी श्रॉफ म्हणतात की, टायगरची आई आयेशा आणि आजी- आजोबा यांच्या पालन- पोषणाचा सहवास मिळाला आहे. ई- टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, “मी याचे सगळे श्रेय टायगरची आई आणि आजीला देतो. ज्यांनी माझ्या दोन्ही मुलांचा खूप चांगला सांभाळ केला आहे. जेव्हा ते लहान होते, तेव्हा मी त्यांच्या सोबत नसायचो. मी एक असा पिता होतो जो सकाळी- सकाळी शूटिंगला जायचो आणि रात्री उशिरा घरी येत असायचो. टायगरमध्ये आज जे काही संस्कार दिसत आहेत, ती सगळी त्याच्या आईची शिकवण आहे. ज्यामध्ये तिने त्याला लोकांचा सन्मान करायला शिकवले आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, “जेव्हा टायगर आणि कृष्णा लहान होते, तेव्हा मी त्यांच्यासोबत नव्हतो. त्यामुळे मी त्यांना काही शिकवू शकलो नाही. टायगरला सगळ्या गोष्टी त्याच्या आईने शिकवल्या आहेत. तो महिलांमध्ये मोठा झाला आहे. त्याच्या आयुष्यात सगळी शक्ती होती. पण मी एक असा पिता होतो, जो केवळ येत जात असायचा.”
यावेळी ते टायगर श्रॉफच्या जन्माची आठवण काढून भावुक झाले होते. ते सांगतात की, “त्याचा जन्म झाला, तेव्हा मला जो आनंद झाला होता, तो आनंद मी अजूनही विसरलो नाही. मी तिथे माझ्या मुलाला शोधत होतो. जेव्हा मी त्याच्याकडे पाहिले, तेव्हा तो माझ्याकडे पाहून हसला आणि मी देवाला त्या क्षणी धन्यवाद म्हणालो.”
त्यांनी पुढे सांगितले की, “मला खूप आनंद होतो, जेव्हा लोक मला टायगर श्रॉफचे वडील म्हणून ओळखतात. ही स्थिती ‘हिरोपंती’ या चित्रपटानंतर आली आहे. टायगर सगळ्यांना खूप आवडतो. मी अनेक वेळा इतरांना असे बोलताना ऐकले आहे की, हे टायगर श्रॉफचे वडील आहेत. त्यावेळी मला हे ऐकून खूप आनंद होतो. लोकं त्याला एवढं प्रेम देतात ते पाहून मला खूप आनंद होतो.”
अशा प्रकारे जॅकी श्रॉफ यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यांची ही पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-खूपच बदललीय ‘लगान’ सिनेमातील ग्रेसी सिंग; २० वर्षांनंतर अशी दिसतेय आमिर खानची अभिनेत्री
-‘बंगाली ब्युटी’ मौनी रॉयने केले बेडरूममधील फोटो शेअर; कातिलाना अंदाजाने चाहते घायाळ