माधुरी दीक्षित अभिनित ‘बकेट लिस्ट’ या मराठी चित्रपटात अभिनेत्री रितिका श्रोत्रीदेखील झळकली होती. चित्रपटात तिच्या अभिनयाचे देखील बरेच कौतुक झाले होते. ती चाहत्यांमध्ये तिच्या निरागस सौंदर्यासाठी ओळखली जाते. नेहमी आपले सुंदर सुंदर फोटो ती चाहत्यांसमोर सादर करत असते.
सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या या अभिनेत्रीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर नुकतेच ३ लाख फॉलोव्हर्स पूर्ण केले आहेत. तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत, तिच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. खरं तर रितिकाने इंस्टाग्रामवर स्वतः चा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, कशाप्रकारे तिने आनंदाने उडी मारली.
उडी मारून क्लिक केलेला हा फोटो चाहत्यांना खूप आवडला आहे. रितिकाने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “३ लाख पार. आता मी उड्या मारत आहे. तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी खूप धन्यवाद.” नेटकरी या फोटोवर कमेंट करून रितिकाचे अभिनंदन करत आहेत. फोटोच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही पाहू शकता की, कशाप्रकारे चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
रितिकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘गुंतागुंत हृदय’ या मालिकेत बालकलाकाराची भूमिका साकारून, अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर ती बऱ्याच मालिकेमध्ये दिसली. मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ या चित्रपटाद्वारे ती प्रथमच रुपेरी पडद्यावर झळकली. तसेच २०१५ साली आलेल्या ‘स्लॅमबुक’ चित्रपटात तिने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. याशिवाय रितिका लवकरच ‘डार्लिंग’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘चूक भूल माफ करा’, म्हणत गाणं गाताना दिसली ‘स्वीटू’; सुमधूर व्हिडिओला नेटकऱ्यांची पसंती
-असे काय झाले की, नेहा कक्कर लागली रडू? व्हिडिओला मिळाले ७६ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज
-निलेश साबळे अन् अंकुर वाढवेची ‘पोपटचंपी!’ ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवरून मजेदार व्हिडिओ व्हायरल