असे काय झाले की, नेहा कक्कर लागली रडू? व्हिडिओला मिळाले ७६ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज


बॉलिवूड गायिका जिने तिच्या आवाजाने सर्वांना अक्षरशः वेड लावले आहे, ती म्हणजे नेहा कक्कर. ती एक गायिकासोबतच एक उत्कृष्ट परफॉर्मर देखील आहे. याचा अंदाज आपल्याला तिच्या म्युझिक व्हिडिओमधून आला आहे. नेहा कक्करने गायलेली सगळीच गाणी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. तिचे सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. त्यामुळे तिची गाणी खूप लोकप्रिय होतात. नेहा ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणाऱ्या गायिकांपैकी एक आहे. ती नेहमी सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असते. अशातच नेहाचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘खड तैनू मैं दस्सा’ या गाण्यावर हावभाव करताना दिसत आहे. (Neha kakkar’s video viral on social media)

नेहा कक्करने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले की, “या गाण्याला इंस्टाग्राम रील्सवर जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. तुमच्या सर्वांचे आभार.”

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. या व्हिडिओमध्ये नेहा रडताना दिसत आहे. खरं तर ती या गाण्यावर अभिनय करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. नेटकरी तिच्या या व्हिडिओवर खूप प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

एका युजरने या व्हिडिओवर कमेंट करून लिहिले आहे की, “तुम्ही याचे हक्कदार आहात,” तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, “क्यूट एक्स्प्रेशन नेहू मॅम.”

नेहा कक्करच्या या व्हिडिओला तिचे चाहते खूप पसंती देत आहेत.‌ काही वेळापूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 76 लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तिची सगळी गाणी खूप सुपरहिट असतात. तिचा चाहतावर्ग मोठा असल्याने तिच्या गाण्यांना भरभरून प्रतिसाद मिळत असतो. या आधी ती तिचा पती रोहन प्रीतसोबत ‘खड तैनू मैं दस्सा’ या गाण्यात दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कपिल शर्माच्या शोमध्ये भोजपुरीच्या सुूपरस्टार्सची धमाल; तर कपिल शर्माचीही बोलती झाली बंद

-‘ही’ गोष्ट अधिक प्रिय असल्यामुळे, बॉलिवुड पार्ट्यांमध्ये जाणे टाळतो अक्षय कुमार; अभिनेत्याने स्वत: केला होता खुलासा

-मीडियम शॉर्ट हेअरमध्ये बरीच सुंदर दिसतेय ऋता; नवीन हेअरकट फ्लाँट करताना दिसली अभिनेत्री


Leave A Reply

Your email address will not be published.